ठाण्यातील कोपरी (Kopri, Thane) परिसरात रविवारी रात्री एका विचित्र आणि थरारक घटनेमुळे एकच खळबळ उडाली. स्वतःला स्थानिक गुंड म्हणवून घेणाऱ्या ‘युट्युब भाई’ (YouTube Bhai) ऊर्फ सिद्धू अभंगे याला जुन्या कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या आक्रमक महिलांनी थेट पोलीस ठाण्याच्या परिसरातच चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या हायव्होल्टेज ड्रामामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.(Women thrashed him)
नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कोपरी परिसरात हा वाद टोकाला गेला. या परिसरामध्ये जुन्या कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून सिद्धू अभंगे याने व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी जबरदस्तीने हफ्त्याची आणि पैशांची मागणी केली होती, असा गंभीर आरोप महिलांनी केला आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता मोठा बदल होणार आहे. सन 2037 पर्यंत एसटीचा 100% ताफा इलेक्ट्रिक करण्याचे ...
महिलांचा रोखठोक विरोध आणि दादागिरीला चपराक
सिद्धूने पैशांसाठी दमदाटी केल्यानंतर संतापलेल्या महिलांनी त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली. हा व्यवसाय शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुढाकाराने आणि आशीर्वादाने सुरू झाला आहे, असे स्पष्ट सांगत महिलांनी त्याला एकही रुपया देण्यास स्पष्ट नकार दिला. असे असतानाही सिद्धूने आपली अरेरावी व दादागिरी सुरूच ठेवल्याने वाद विकोपाला गेला.
पोलीस ठाण्याच्या परिसरातच धु-धु धुतले
वाद वाढल्यानंतर प्रकरण थेट कोपरी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. मात्र, सिद्धूच्या सातत्यपूर्ण गुंडगिरीला आणि त्रासाला आधीच वैतागलेल्या महिलांचा संताप अनावर झाला. पोलिसांच्या समोरच किंवा पोलीस ठाण्याच्या आवारात महिलांनी आक्रमक होत सिद्धू अभंगे याच्यावर हल्ला चढवला आणि त्याला चांगलाच धडा शिकवला. महिलांचे हे रौद्ररूप पाहून उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांचीही चांगलीच धांदल उडाली. संतापलेल्या महिलांच्या तावडीतून त्या तरुणाला सोडवताना पोलिसांची मोठी दमछाक झाली आणि त्यांना चांगलाच घाम फुटला. या घटनेचा व्हिडिओ आणि चर्चा आता संपूर्ण ठाण्यात जोरदार सुरू असून, महिलांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.(Women thrashed him)






