बीड : “आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या...” अशी भावनिक हाक देत बीडच्या हिवरापहाडी येथील चिमुकल्या विद्यार्थिनींनी केलेल्या ‘बॉटल माईक’ रिपोर्टिंगची अखेर दखल घेण्यात आली आहे. या विद्यार्थिनींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. त्यांच्या निर्देशानंतर हिवरापहाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. (Beed Bottle Mic Reporting)
हिवरापहाडी (केंद्र जरूड), ता. बीड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या काही दिवसांपासून गणित, विज्ञान आणि संगणक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे समोर आले होते.
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; पिकानुसार मदतीचे निकष ठरवणार, दर मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीचा आढावा मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने ...
आपल्या शाळेतील ही समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थिनींनी अनोखी शक्कल लढवली. पाणी पिण्याच्या प्लास्टिक बॉटलचा माईक तयार करून त्यांनी थेट वर्गातूनच ‘रिपोर्टिंग’ केली. शिक्षक नसल्याने होणाऱ्या अडचणी त्यांनी आपल्या शब्दांत मांडल्या आणि “आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या...” अशी मागणी केली. (Beed Bottle Mic Reporting)
विद्यार्थिनींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत बीड जिल्हा प्रशासनाला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या वापरावर कठोर सुरक्षा उपाय लागू करण्याची मागणी केली आहे. ...
या निर्देशानंतर बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभाग ॲक्शन मोडमध्ये आले. वरिष्ठांच्या आदेशानुसार शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती करण्यात आली आहे.(Beed Bottle Mic Reporting)
चिमुकल्या विद्यार्थिनींच्या अनोख्या ‘बॉटल माईक’ रिपोर्टिंगमुळे दुर्गम भागातील शाळेतील शिक्षकांची समस्या प्रशासनापर्यंत पोहोचली आणि त्यावर तातडीने कार्यवाही झाली. त्यामुळे आपल्या शिक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या या विद्यार्थिनींच्या प्रयत्नांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.(Beed Bottle Mic Reporting)






