Wednesday, September 30, 2026

BMC News : मुंबईत ७० वर्षांवरील ज्येष्ठांना आयुष्यमान वय वंदना कार्ड; एमडीसी अभियानाचा २ ऑक्टोबरपासून शुभारंभ,महापालिकेच्यावतीने १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर

BMC News : मुंबईत ७० वर्षांवरील ज्येष्ठांना आयुष्यमान वय वंदना कार्ड; एमडीसी अभियानाचा २ ऑक्टोबरपासून शुभारंभ,महापालिकेच्यावतीने १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट (एमडीसी) अभियान १०० दिवसांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ २ ऑक्टोबर २०२६ रोजी होईल. दिनांक २ ऑक्टोबरपासून १०० दिवसांच्या कालवधीसाठी महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात राबविण्यात येणार आहे. अभियानअंतर्गत मुंबईतील अधिकाधिक पात्र नागरिकांचे आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट (आभा) कार्ड निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासोबतच ७० हून अधिक वयोमान असलेल्या जेष्ठ नागरिकांचे आयुष्यमान वय वंदना कार्ड तयार करण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने आभा कार्डची उपलब्धतता ही अत्यंत मदतीची ठरणार आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनुषंगाने उपचारांची उपलब्धतता सहजरित्या होण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. त्यामुळे अधिकाधिक मुंबईकरांनी या अभियानात सहभाग व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी केले आहे. मुंबईतील मोठ्या प्रमाणात नागरिकांना आभा कार्डच्या माध्यमातून फायदा व्हावा, यादृष्टीने महानगरपालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या अभियानासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट अभियानासाठी प्रामुख्याने वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याकडे महत्वाची जबाबदारी असणार आहे. अधिकाधिक नागरिकांना आभा कार्डच्या नोंदणीमध्ये समाविष्ट करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागाचे सहायक आयुक्त आणि उपायुक्त आभा कार्ड नोंदणी अभियानाच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्वाच्या अभियानात मुंबईकर नागरिकांना सक्रियपणे सहभागी करून घेण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने या अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांची नोंद आभा कार्ड नोंदणीसाठी करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिल्या आहेत. महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य संस्थांची हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्रीमध्ये नोंदणी करावी. तसेच सर्व पात्र डॉक्टर, परिचारिका, आयुष वैद्य, फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट आदींची हेल्थकेअर प्रोफेशनल रजिस्ट्रीमध्ये नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.

अभियानाची उद्दिष्टे

आरोग्य नोंदी आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट-आभाशी जोडणे आणि महानगरपालिका रूग्णांमध्ये बाह्यरूग्णसेवांमध्ये ,ई प्रस्क्रिप्शन, ई डिस्चार्ज समरी, डिजिटल लॅब / रेडिओलॉजी अहवाल आणि ईएमआर/ एचएमआयएस यासारख्या आयुष्मान डिजिटल भारत मिशनसोबतच्या सुसंगत डिजिटल सेवा वाडविणे ही अभियानाची उद्दिष्टे आहेत. मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट (एमडीसी) अभियान एकूण तीन टप्प्प्यांमध्ये मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट (एमडीसी) अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.(BMC Campaign)

पहिला टप्पा

पहिल्या टप्प्यात जनजागृती मोहीम, अधिकारी - कर्मचारी व स्वयंसेवकांचे प्रशिक्षण आणि स्वयंसेवक नोंदणी करण्यात येईल. तसेच प्रचार साहित्याचे वितरण करण्यात येईल.

दुसरा टप्पा

या टप्प्यात रूग्णालये, दवाखाने, आपला दवाखाना, प्रसूतिगृहे, प्रशासकीय विभाग कार्यालये, शाळा - महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, झोपडपट्टी वस्त्या, बाजारपेठा आणि शिधावाटप केंद्र येथे मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात येईल. महानगरपालिका मुख्यालय, विभागीय आणि प्रशासकीय कार्यालये येथे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष आभा नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येतील.

तिसरा टप्पा

जेेष्ठ नागरिक, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी घरपोच / विशेष जनसंपर्क मोहीम आयोजित करण्यात येईल. तसेच आभा नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येतील.भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) अंतर्गत प्रत्येक नागरिकाला आयुषमान भारत हेल्थ अकाऊंट (आभा) ही डिजिटल ओळख उपलब्ध करून अपेक्षित आहे. त्यासोबतच आरोग्य संस्था आणि आरोग्य व्यावसायिकांना राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेशी जोडणे अपेक्षित आहे.

शिधावाटप केंद्रावर पीएमजेएवाय/एमजेपीजेएवाय कार्ड नोंदणी

मुंबईतील पीएमजेएवाय/एमजेपीजेएवाय कार्ड पात्र लाभार्थ्यांसाठी सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका यांच्यामार्फत शिधावाटप दुकानांवर तयार करण्यात येतील. शिधावाटप दुकानांवर येणाऱ्या पात्र शिधापत्रधारकांची ओळख पटविणे, दुकानांचे वेळापत्रक निश्चित करणे, रेशन कार्ड / ई केवायसी आधारे पात्रता पडताळणी करण्यात येईल. या कामासाठी सीएचव्ही, आशा यांच्यामार्फत शिधावाटप केंद्रावर कार्ड तयार करण्यात येतील.(BMC Campaign)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >