दुबई हे शहर गेल्या काही वर्षात पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दुबईत काही ना काही योजनाची अंमलबजावणी केली जाते. आता या ठिकाणी गोल्डन वॉकवे तयार होणार आहे.
सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत आणि सामान्य व्यक्तीला ते घेणं परवडत देखील नाही. असं असताना दुबईत मात्र गोल्डन रोड तयार होत आहे. या मार्गाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. दुबई आणि सोनं असं एक समीकरणच तयार झालं आहे. लग्झरी आणि वेगळ्या गोष्टींबाबत दुबईची कायम चर्चा होत असते. आतापर्यंत अनेक वेगळेपणा सांगणाऱ्या गोष्टी दुबईत झाल्या आहेत आणि होत आहेत. नुकतंच दुबईत 16 किलोहून अधिक वजनाचे सोन्याचे कानातले तयार करून रेकॉर्ड केला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी कायम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. पण आता चक्क सोन्याचा रस्ता बनणार असल्याने चर्चा तर होणारच.. दुबईत 24 कॅरेट सोन्यापासून जगातील सर्वात लांब वॉकवे तयार करण्याची योजना आहे. या प्रकल्पाची सुरूवात वर्ष 2026 च्या शेवटी होणार आहे. त्यामुळे दुबईतील जाणाऱ्या पर्यटकांना एक वेगळी अनुभूती मिळणार आहे. पर्यटकांना गोल्डन स्ट्रीट आकर्षित करेल हे मात्र नक्की...
कधी तयार होईल 24 कॅरेट सोन्याचा रस्ता?
दुबई गोल्ड डिस्ट्रिक्टचे वरिष्ठ अधिकारी राशिद अल हरमूदी यांच्या मते, काम सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात पूर्ण होईल. पण या वॉकवेची लांबी किती असेल? त्यासाठी किती सोनं लागेल? सामान्य नागरिकांना त्यावरून चालता येईल का? असे प्रश्न अनुत्तरितच आहेत. पण या प्रकल्पाचा मुख्य उद्देश फक्त रस्ता बनवण्याचा नाही तर दुबईत पर्यटकांना आकर्षित करण्याचा आहे. या गोल्ड वॉकवेच्या माध्यमातून पर्यटक सोनं आणि ज्वेलरीशी निगडीत उद्योगधंदे जवळून पाहू शकतील. त्यामुळे हा सुवर्ण मार्ग भविष्यात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.
ब्राझील : ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ...
दुबईतील गोल्डन डिस्ट्रिक्ट आहे तरी काय?
दुबईतील गोल्ड डिस्ट्रिक्ट शहर डीरा भागात आहे. या भागाची गोल्डन सिटी म्हणून एक ओळख आहे. कारण या ठिकाणी सोनं, सोन्याचे दागिने आणि किंमती धातूंच्या व्यापार चालतो. त्यामुळे सोनं खरेदीसाठी जगभरातील लोकं आणि पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. या ठिकाणी भारताच्या तुलनेत स्वस्त सोनं मिळतं. त्यामुळे हे भारतीयांना कायम आकर्षित करत असतं. असं असताना हे गोल्डन वॉकवेमुळे चर्चेत असेल.