संजय राऊत भाकरी 'मातोश्री'ची खातात अन् चाकरी पवारांची करतात

'दादा' भडकले आणि 'दादां'ना भिडले! विधानसभेत गोंधळ!


मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात टीका करत असताना मंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तात्काळ जागेवरुन उठत यावर आक्षेप घेतला.


ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील मंत्री दादा भुसे यांच्यावर ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव येथील गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रुपयांचे शेअर्स गोळा केल्याचा गंभीर आरोप भुसे यांच्यावर केला आहे. कंपनीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष कंपनीच्या वेबसाइटवर कमी शेअर्स दाखवण्यात आले आहेत. ही थेट जनतेची लूट आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.


संजय राऊतांच्या या ट्विटवर आज विधानसभेत निवेदन मांडत दादा भुसे यांनी राऊतांना चोख प्रत्युत्तर दिले. दादा भुसे म्हणाले की, आम्हाला नेहमी गद्दार म्हणणारे, मात्र आमच्याच मतांवर निवडून येणारे महागद्दार संजय राऊत यांनी काल माझ्याबद्दल एक ट्विट केले. माझी आपल्याला विनंती आहे की, जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी जे ट्विट केले आहे त्याची चौकशी व्हावी. या प्रकरणात मी दोषी आढळल्यास मंत्रिपदाचा, आमदारकीचाच काय संपूर्ण राजकारणातून निवृत्त होईल. तसेच जर या प्रकरणात खोटं आढळून आल्यास त्यांनी आमच्या मतावर निवडून आलेल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. त्याचप्रमाणे दैनिक सामनाच्या संपादकपदाचा राजीनामा देखील द्यावा, असे आव्हान दादा भुसे यांनी संजय राऊतांना दिले आहे. तसेच संजय राऊतांनी माफी न मागितल्यास मालेगावचे शिवसैनिक त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील दादा भुसे यांनी दिला आहे.


दादा भुसे पुढे म्हणाले की, हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीचे माननीय शरद पवार यांची करतात आणि हे आम्हाला शिकवतात. दादा भुसेंनी असे वक्तव्य करताच विरोधी पक्षातील आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 'दादा भुसे हाय हाय' अशा घोषणा देखील सभागृहात देण्यात आल्या. त्याचवेळी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तात्काळ जागेवरुन उठत दादा भुसे यांना सुनावले. तुम्हाला काय मांडायचे आहे ते मांडा, मात्र तुम्ही आमच्या पक्षाचे प्रमुख शरद पवारसाहेबांचे यांचे नाव घेण्याची गरज नाही. दादा भुसे यांनी सभागृहात जे काही म्हटले आहे, ते रेकॉर्डवरुन काढून टाका, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दादा भुसे यांनी केलेले विधान आम्ही तपासून घेऊ आणि त्यात जे काही अनुचित असेल ते रेकॉर्डवरुन काढून टाकण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिले.

Comments
Add Comment

Hirakani Kaksha Maharashtra : स्तनदा मातांसाठी एसटीचा मोठा निर्णय! राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’

मुंबई : महाराष्ट्रातील महिला प्रवाशांसाठी विशेषतः स्तनदा मातांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि खासगी सुविधा उपलब्ध

Belgaum News: बेळगावमध्ये काळाचा घाला ! भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Belgaon : देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह सुरू असतानाच बेळगावमधून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गणेश

Dagdusheth Ganpati Atharvashirsha Pathan 2026 : पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; दगडूशेठ गणपती प्रांगणात ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!

पुणे : गणेशोत्सवाच्या मंगलमयी वातावरणात पुण्यात ऋषीपंचमीनिमित्त भक्ती आणि स्त्रीशक्तीचा एक अनोखा संगम पाहायला

Jalgaon Accident News : जळगावमध्ये भीषण अपघात! डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Jalgaon Accident News : मलकापूरहून अजंदे गावाकडे दुचाकीने परतणाऱ्या दोघांवर नायगाव फाट्याजवळ (ता.मुक्ताईनगर) काळाने घाला

Nashik : नाशिकमध्ये मोदकांच्या २५ व्हरायटी, गोल्डन मोदकांनी वेधले लक्ष; किलोचा दर तब्बल २७ हजार रुपये

Nashik : गणेशोत्सवानिमित्त लाडक्या बाप्पाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले असून, गणरायाच्या नैवेद्यासाठी मोदक आणि

Ganpati miravnuk accident : छत्रपती संभाजीनगरमधील भीषण अपघात; गणपती मिरवणुकीत कंटेनर घुसल्याने दोन गणेशभक्त ठार, १२ जण जखमी

छत्रपती संभाजीनगर: गणपती बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहात आणि आनंदा वातावरणात सुरू असलेल्या मिरवणुकीत एका भरधाव