तहसीलदार संपावर, तहसील कार्यालयात शुकशुकाट!

मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी संपावर गेले होते. आठ दिवस चाललेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. त्यानंतर आता राज्यातील नायब तहसीलदार आणि तहसीलदार बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे ३५८ तालुक्यातील तहसील कार्यालयात शुकशुकाट आहे. याचा फटका मात्र ग्रामिण भागातून विवध कामांसाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिक आणि शेतक-यांना बसला आहे.


राजपत्रित वर्ग-२ नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे मुद्द्यावरुन हा संप पुकारण्यात आला आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते. त्यामुळे ग्रेड पे ४३०० रुपयांवरुन ४८०० रुपये वाढवण्याची त्यांची मागणी आहे.


दरम्यान राज्य सरकारने १३ ऑक्टोबर १९९८ रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरुन वर्ग दोन केला होता. मात्र वेतनवाढ केली नव्हती. मागील २५ वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात. मात्र वर्ग तीनचे वेतन घेत आहेत. त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.


राज्यातील ६०० तहसीलदार आणि २२०० नायब तहसीलदार यांच्या बेमुदत संपामुळे तहसील कार्यालयात आज शुकशुकाट आहे. या आंदोलनामुळे राज्यातील महसूल विभागातील शासकीय यंत्रणा कोलमडली आहे.

Comments
Add Comment

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला तिसऱ्यांदा परवानगी नाकारली, पोलिस मुंबईच्या वेशीवरच अडवणार?

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आता मुंबईच्या

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर नवा विक्रम, ९० टन आयात माल घेऊन Boeing 777F दाखल

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. १५

Hirakani Kaksha Maharashtra : स्तनदा मातांसाठी एसटीचा मोठा निर्णय! राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’

मुंबई : महाराष्ट्रातील महिला प्रवाशांसाठी विशेषतः स्तनदा मातांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि खासगी सुविधा उपलब्ध

Belgaum News: बेळगावमध्ये काळाचा घाला ! भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Belgaon : देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह सुरू असतानाच बेळगावमधून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गणेश

Dagdusheth Ganpati Atharvashirsha Pathan 2026 : पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; दगडूशेठ गणपती प्रांगणात ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!

पुणे : गणेशोत्सवाच्या मंगलमयी वातावरणात पुण्यात ऋषीपंचमीनिमित्त भक्ती आणि स्त्रीशक्तीचा एक अनोखा संगम पाहायला

Jalgaon Accident News : जळगावमध्ये भीषण अपघात! डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Jalgaon Accident News : मलकापूरहून अजंदे गावाकडे दुचाकीने परतणाऱ्या दोघांवर नायगाव फाट्याजवळ (ता.मुक्ताईनगर) काळाने घाला