आज ईद आणि अक्षय्य तृतीया सोन्याचे दर जाणून घ्या

मुंबई: साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला सर्वात महत्वाचा सण म्हणजे अक्षय्य तृतीया आज देशासह राज्यात अक्षय्य तृतीया सण उत्साहात साजरा होत आहे. आज सराफा बाजारात नागरिकांची झुंबड उडाली आहे. सोन्याच्या विक्रमी वाढीनंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याची किंमत ६० हजार १९१ रुपयांवर येऊन पोहोचली आहे. सोन्याच्या दरात ४२५ रुपयांनी घसरण झाली आहे.


मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात दहा हजार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे जरी सराफा बाजारात गर्दी असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत ही गर्दी कमी आहे. मात्र, ईद आणि अक्षय्य तृतीया हे दोन्ही सण एकत्र आल्याने सोन्याची मोठी खरेदी होईल असा अंदाज सोने व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात आहे.


दुसरीकडे, चांदीबद्दल बोलायचे झाले तर, शुक्रवारीही चांदीच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव ६४६ रुपयांनी घसरून ७४ हजार ७७३ रुपये प्रति किलोवर आला आहे. -



देशातील दोन प्रमुख शहरांतील चांदीचे आणि सोन्याचे दर


दिल्ली: २४ कॅरेट सोने - ६१ हजार ३०० रुपये, २२ कॅरेट सोने - ५६ हजार २०० रुपये प्रति १० ग्रॅम
मुंबई: २४ कॅरेट सोने - ६१ हजार १५० रुपये, २२ कॅरेट सोने - ५६ हजार ०५० रुपये प्रति १० ग्रॅम


दिल्ली : ७६ हजार ९०० रुपये चांदी प्रति किलो
मुंबई : ७६ हजार ९०० रुपये चांदी प्रति किलो

Comments
Add Comment

FDA Action: भेसळखोरांचे धाबे दणाणले! FDAने केलेल्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त, पाच अस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने मुंबई, चंद्रपूर, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धडक कारवाई करत भेसळयुक्त

Vishakha Raut : उबाठा गटाच्या माजी नगरसेविका विशाखा राऊत यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; अपात्रता कायम

मुंबई : उबाठा गटाच्या माजी नगरसेविका विशाखा राऊत (Vishakha Raut) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा कायदेशीर फटका बसला

मुंबई पोलिसांची वॉकी- टॉकी चोरणारा आरोपी गजाआड, 700 CCTV कॅमेऱ्यातून चोराचा घेतला शोध

मुंबई: मुंबई पोलिसांची वॉकी टॉकी घेणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीला मुंबई

R. C. Chavan : कामकाज आणि पद्धतीवरून मतभेद, निवृत्त न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांचा महाराष्ट्र UCC समितीचा राजीनामा

मुंबई : महाराष्ट्रात समान नागरी कायदा (Uniform Civil Code) (Maharashtra government’s committee ) लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य

Mumbai Crime News : 'मारहाण करून जीव घेतला...' कुटुंबाचा संताप; RPFच्या ताब्यात असलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

CSMT घटनेची आता थेट CID कडून चौकशी! मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)

Pu La Deshpande Literature : पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक प्रकाशित होणार

- १० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता; सांस्कृतिक विभागाचा निर्णय मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला