Pu La Deshpande Literature : पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक प्रकाशित होणार

- १० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता; सांस्कृतिक विभागाचा निर्णय


मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाला समृद्ध करणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या संकल्पाला आता शासन निर्णयाचे बळ मिळाले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकारातून पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी होणाऱ्या खर्चास १० लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.






सांस्कृतिक कार्य विभागाने पु. ल. देशपांडे यांच्या संग्रहित पत्रांचे पुस्तक प्रकाशित करण्यास आणि त्यासाठी होणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पु. ल. देशपांडे यांच्या जतन केलेल्या पत्रसंग्रहाचे शास्त्रशुद्ध संपादन व पुस्तक रूपाने प्रकाशन करण्याच्या प्रक्रियेला संस्थात्मक पाठबळ मिळाले आहे.


पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व अशा विविध क्षेत्रांतून त्यांनी मराठी समाजाशी समृद्ध संवाद साधला. त्यांच्या पत्रव्यवहारात भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, पं. रविशंकर, ग. दि. माडगूळकर, वि. वा. करंदीकर, जयवंत दळवी, विजय मर्चंट, बाबा आमटे, स्वामी विज्ञानानंद, पांडुरंगशास्त्री आठवले, दया पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे. त्यामुळे हा पत्रव्यवहार केवळ वैयक्तिक संवाद नसून त्या काळातील साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरतो.


पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीताबाई यांनी अनेक मान्यवरांची पत्रे जपून ठेवली होती. तसेच पु. लं.नी विविध मान्यवरांना लिहिलेल्या पत्रांच्या प्रतीही सुनीताबाई आणि कुटुंबीयांच्या संग्रहात उपलब्ध आहेत. या सांस्कृतिक ठेव्याचे पुस्तक रूपाने प्रकाशन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानंतर या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रमाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयातून . पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यिक योगदानासोबतच त्यांच्या समकालीन व्यक्तिमत्त्वांशी असलेल्या संवादाचा ठेवा संशोधक, साहित्यप्रेमी आणि नव्या पिढीसाठी उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment

Uniform Cibil Code: समान नागरी कायद्यावर मुंबईत जनसुनावणी; नागरिकांना मते मांडण्याची संधी!

समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांचे विचार आणि मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागात विभागीय स्तरावर

BMC Hospitals: महानगरपालिकेच्या रूग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांना ३ दिवसांत मिळणार जन्माचा दाखला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित चार प्रमुख रूग्णालये आणि १६ उपनगरीय रूग्णालये याठिकाणी

डॉ. थंगजम धबाली सिंह यांना ‘वन इंडिया पुरस्कार-२०२६’ प्रदान; तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते गौरव

मुंबई : मणिपूरमध्ये आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती, पर्यटन आणि भारत-जपान मैत्रीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान

Ritu Tawde in Bhandup: भांडुप (पश्चिम) येथील गुजराती हिंदू स्‍मशानभूमीच्‍या समस्यांची महापौरांनी घेतली दखल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप (पश्चिम) येथील गुजराती हिंदू स्‍मशानभूमीच्‍या समस्‍या तातडीने मार्गी

मागील 15 वर्षांपासून प्रलंबित कांदिवली पश्चिम येथील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; तब्बल 27 बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

MSRTC Record Collection: लालपरीची दिवाळी जोरात! एका दिवसात कमावले 46.53 कोटी रुपये

मुंबई:  दिवाळीचा आनंद, सलग सुट्ट्यांची पर्वणी आणि गावी जाण्यासोबतच परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी महाराष्ट्र