महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार?

'बिपरजॉय' चक्रीवादळाने उडवली हवामान विभागाच्या अधिका-यांची झोप!


पुणे : केरळमध्ये दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्रात कधी दाखल होणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. केरळमध्ये पाऊस पोहोचला असला तरी मुंबईसह राज्यातील काही भागांत अजूनही उन्हाचा फटका बसत आहे. मान्सून साधारणपणे १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि १० जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होतो. पण, आता केरळमध्ये पाऊस उशिरा आल्याने राज्यातील पाऊसही लांबला आहे. त्यातच 'बिपरजॉय' चक्रीवादळ येत्या ४८ तासांत आणखी तीव्र होण्याचा अंदाज असल्याने या चक्रीवादळाने हवामान विभागाच्या अधिका-यांची झोप उडवली आहे.


प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबई प्रमुख एस. जी. कांबळे यांनी सांगितले की, "महाराष्ट्रात १० जून आणि मुंबईत ११ जून ही मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख आहे. मान्सून केरळमध्ये उशीराने पोहोचला आहे. त्यातच 'बिपरजॉय' चक्रीवादळ घोंगावते आहे. यामुळे हे चक्रीवादळ आणि मान्सूनच्या प्रगतीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनच्या सुरुवातीबाबत माहिती मिळेल."


साधारणपणे १ जनपर्यंत केरळमध्ये दाखल होणाऱ्या पाऊस ८ जूनला केरळमध्ये पोहोचला. या पार्श्वभूमीवर १८ जूनपर्यंत महाराष्ट्रात पाऊस येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामध्ये दोन ते तीन दिवसांचा फरक जाणवू शकतो.


स्कायमेट वेदरनुसार, पुढील तीन ते चार दिवस खूप तीव्र चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Pune Ganesh Visarjan : पुण्यातील गणोशोत्सवानिमित्त वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय, घरून बाहेर पडण्यापूर्वी हे रस्ते नक्की तपासा

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठे बदल

Karanja Fishermen's Port : करंजा बंदराच्या विकासासाठी 136.76 कोटींचा निधी मंजूर; 21 विकासकामांना मिळणार गती

उरण : करंजा मच्छीमार बंदराच्या विकासासाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून 136.76 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Devendra Fadnavis : दोन दिवसांत दुष्काळाचा जीआर, शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार

दुष्काळी भागांतील दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; रब्बी पिकांसाठीही मदत, पाणी-चाऱ्याचे नियोजन मुंबई :

Raj Thackeray : जाती-पातीत अडकू नका, शिक्षणव्यवस्थेतील दोषांवर प्रश्न विचारा ! साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे यांची भूमिका

विद्यार्थ्यांना आंदोलनाची दिशा भरकटू न देण्याचे आवाहन मुंबई : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे या २० वर्षीय

Maharashtra Weather : मान्सूनच्या परतीच्या काळात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासह 13 राज्यांना हवामान विभागाचा इशारा

मुंबई : यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात पावसाने

Ketan Agrawal Case : दुख:त कसं रडायचं? Google अन् ChatGPT वर सर्च; लोणावळ्यातील 'ती' घटना सुध्दा अभ्यासली, सिया गोयलच्या सर्च हिस्ट्रीने केली पोलखोल

पुणे : लोणावळा येथील बहुचर्चित केतन अग्रवाल प्रकरणात आता अनेक अपडेट समोर येत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या