Raj Thackeray : जाती-पातीत अडकू नका, शिक्षणव्यवस्थेतील दोषांवर प्रश्न विचारा ! साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे यांची भूमिका

विद्यार्थ्यांना आंदोलनाची दिशा भरकटू न देण्याचे आवाहन


मुंबई : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे या २० वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली चर्चा जातीय वादात अडकवण्याऐवजी शिक्षणव्यवस्थेतील दोषांवर प्रश्न उपस्थित करण्याची गरज आहे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. परीक्षेतील गैरप्रकाराचा आरोप सिद्ध होण्याआधी मृत विद्यार्थ्याला दोषी ठरवणे किंवा जातीय छळाचा आरोप झाल्यानंतर चौकशी पूर्ण होण्याआधी प्राध्यापकांना दोषी ठरवणे योग्य नाही, असे सांगतानाच विद्यार्थ्यांनी जात-धर्माच्या मुद्द्यांत न अडकता आपल्या मागण्यांवर ठाम राहावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.


आयआयटी प्रशासनाने सुरुवातीला परीक्षेदरम्यान साहिलने मोबाइल आणि चॅटजीपीटीचा वापर केल्याचा आरोप केला होता. मात्र, तपास पूर्ण होण्याआधी हा आरोप जाहीर करणे अयोग्य असल्याचे मान्य करत प्रशासनाने नंतर माफी मागितली. दुसरीकडे, साहिलच्या कुटुंबीयांनी जातीय छळाचे आरोप केले असून त्यावर गुन्हा दाखल होऊन तपास सुरू आहे. प्राध्यापकांनीही आपली बाजू मांडली आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन एका २० वर्षांच्या तरुणाला आयुष्य संपवण्याचा निर्णय घ्यावा लागला, त्यामागील मानसिक ताण आणि शिक्षणव्यवस्थेतील त्रुटींचा विचार होणे आवश्यक आहे, असे ठाकरे यांनी म्हटले.


विद्यार्थी परीक्षेत गैरप्रकार करत असेल तर त्याला रोखणे आणि नियमानुसार कारवाई करणे हे प्राध्यापकांचे कर्तव्य आहे. मात्र, आरोप सिद्ध होण्यापूर्वी विद्यार्थ्याला गुन्हेगार ठरवणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे जातीय छळाचा आरोप झाला म्हणून चौकशी पूर्ण होण्याआधी प्राध्यापकांना दोषी ठरवणेही योग्य नाही. या प्रकरणातील तपास पूर्ण होऊ द्यावा आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांना अशा टोकाच्या मानसिक अवस्थेपर्यंत नेणाऱ्या व्यवस्थेचा विचार करावा, असे ठाकरे यांनी म्हटले.


गेल्या काही दशकांत महाराष्ट्रात जातीय ओळखींचा प्रभाव वाढला असून त्याचा परिणाम शाळा, कार्यालये आणि आता आयआयटीसारख्या संस्थांपर्यंत पोहोचत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयआयटींचे वर्णन ‘आधुनिक भारताची मंदिरे’ असे केले होते. अशा संस्थेत विद्यार्थी आपल्यातून गेला असताना त्याच्या मृत्यूमागील व्यवस्थात्मक कारणांपेक्षा जातीय पैलू पुढे येणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.



शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या प्रक्रियेत मोठे नुकसान


- आयआयटीच्या प्रवेशापासूनच विद्यार्थ्यांवर स्पर्धेचा ताण असतो. मोजक्या जागांसाठी लाखो विद्यार्थी स्पर्धा करतात. प्रवेशानंतर अभ्यासाचे ओझे आणि पुढे कॅम्पस निवडीत काय होईल, याची चिंता असते. आयआयटी, आयआयएमसह विविध क्षेत्रांत पूर्वीसारख्या संधी आणि पगार मिळतीलच याची खात्री नसल्याने हा ताण आणखी वाढतो. हा प्रश्न आयआयटीपुरता मर्यादित नसून कला, वाणिज्य शाखांपासून डॉक्टर आणि अभियंत्यांपर्यंत सर्वत्र दिसतो, असे ठाकरे यांनी नमूद केले.


- गेल्या ३०-४० वर्षांत शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या प्रक्रियेत भारतीय शिक्षणव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले असून त्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले. आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी समुपदेशनाची व्यवस्था, २४ तास मानसोपचारतज्ज्ञांची उपलब्धता, तक्रारींचे पारदर्शक पद्धतीने निराकरण आणि शिस्तभंगाच्या कारवाईवेळी विद्यार्थी खचणार नाही अशी व्यवस्था करण्याच्या मागण्या केल्या आहेत. या मागण्यांवरच आंदोलनाची दिशा केंद्रित राहिली पाहिजे.


- ‘जात आणि धर्म ही अमोघ अस्त्रे आहेत. हे मुद्दे पुढे आणले की मूळ प्रश्नापासून लक्ष भरकटवणे सोपे जाते,’ असे सांगत विद्यार्थ्यांनी अशा राजकारणात अडकू नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले. आयआयटी किंवा कोणत्याही कॅम्पसमध्ये जात-धर्माच्या मुद्द्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मनभेद आणि फूट निर्माण होईल, असे काही करू नये, असेही त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : मान्सूनच्या परतीच्या काळात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासह 13 राज्यांना हवामान विभागाचा इशारा

मुंबई : यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात पावसाने

Ketan Agrawal Case : दुख:त कसं रडायचं? Google अन् ChatGPT वर सर्च; लोणावळ्यातील 'ती' घटना सुध्दा अभ्यासली, सिया गोयलच्या सर्च हिस्ट्रीने केली पोलखोल

पुणे : लोणावळा येथील बहुचर्चित केतन अग्रवाल प्रकरणात आता अनेक अपडेट समोर येत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या

Nitesh Rane News: सिंधुदुर्गमधील नुकसानीसाठी स्वतंत्र निकषांचा विचार करा- पालकमंत्री नितेश राणे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: "सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये येत असून, जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचे तातडीने

Sunetra Pawar : दुष्काळी स्थितीमुळे राष्ट्रवादीचे राज्यव्यापी शिबिर पुढे ढकलले

- नाशिकमध्ये २७ सप्टेंबरला होते नियोजन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा निर्णय मुंबई : दिवंगत अजित पवार

Maharashtra Government : दिव्यांग पाल्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची तीन वर्षांची अट रद्द

- कायमस्वरूपी अपंगत्वासाठी प्रमाणपत्र एकदाच; तात्पुरत्या अपंगत्वासाठी पाच वर्षांनी प्रमाणपत्र सादर करण्याची

Eknath Shinde : आधुनिक सुविधांनी सज्ज १०८ रुग्णवाहिका लवकरच सेवेत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पाअंतर्गत नव्या १०८ रुग्णवाहिका लवकरच शासकीय सेवेत