स्कुल चले हम! वाचा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर काय म्हणाले?

पुणे: विदर्भ वगळता आजपासून राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावं, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विदर्भातील शाळा ३० जून रोजी सुरु होणार आहेत.


आजपासून महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात होत आहे. शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे. विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व आहेत. त्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनाने विविध निर्णय घेतल्याचे मंत्री केसरकर म्हणाले. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आले असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वह्यांची पाने देण्यात आली आहेत. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, सॉक्स देण्यात येणार आहेत.शेतीचे ज्ञान आवश्यक असल्याने यापुढे शेती विषय शिकवण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.


कोणतेही काम करण्यात कमीपणा नसतो हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी श्रमाची महती समजून घ्यावी. माणुसकी जपावी असा सल्लाही दीपक केसरकर यांनी दिला. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा आणि महाराष्ट्रासह देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावावा. जगातील सर्वात तरुण देश म्हणून जगाला उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा असे केसरकर म्हणाले. या कामी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शासन विद्यार्थ्यांच्या सोबत असून जगाचे दूत म्हणून सेवा देण्यासाठी तयार व्हावे, असेही केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले.

Comments
Add Comment

Rural Wages: दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून निधी उपलब्ध, गावकऱ्यांना कोणती कामं करता येणार?

मुंबई: दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि मजूर वर्गावर होतो. यामुळे ग्रामीण

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिलासा; कर्जवसुलीबाबत बँकांना महत्त्वाचे निर्देश

मुंबई : राज्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुलीबाबत महत्त्वाचे निर्देश

DCM Sunetra Pawar: बारामतीतील 'त्या' घटनेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं दु:ख, म्हणाल्या...

पुणे: बारामती तालुक्यातील शेरेवाडी गावामध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शेरेवाडी

Baby Food Regulations : फॉर्म्युला दुधाच्या जाहिरातींवर बंदी; महाराष्ट्रात शिशु आहारासाठी नवे नियम लागू

मुंबई : राज्यातील शिशु पोषणासाठी वापरल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या उत्पादनापासून विक्री आणि

FDA Action: कसारा घाटात एफडीएने पाठलाग करत 1 कोटी 26 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत, गुप्त माहितीच्या आधारे रचला प्लॅन

ठाणे: अन्न- औषध प्रशासनाकडून (FDA)सोमवारी 27 सप्टेंबर 2026 रोजी, संपूर्ण राज्यात प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला

Recruitment Exam Reform : भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा; 30 हजार सूचनांनंतर टास्क फोर्सचा सखोल अभ्यास

मुंबई : राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, प्रभावी आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाने गठित