DCM Sunetra Pawar: बारामतीतील 'त्या' घटनेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं दु:ख, म्हणाल्या...

पुणे: बारामती तालुक्यातील शेरेवाडी गावामध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शेरेवाडी गावामध्ये मध्यरात्री घरामध्ये झोपलेल्या दोन वयोवृद्ध महिलांची एका अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना घडली आहे. कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत अशा दोन मृत महिलांची नावे आहेत. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत बारामतीतील घटनेच्या चौकशीची मागणी केलेली आहे.



शेअर केलेल्या एक्स पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लिहिलंय की, "बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे दोन वृद्ध महिलांच्या हत्येची घटना अत्यंत दुःखद आहे. शेरेवाडी (बाबुर्डी) येथे घराच्या ओसरीत झोपलेल्या दोन महिलांची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली आहे. घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळी मिळालेले पुरावे आणि इतर सर्व बाबींच्या आधारे तपास सुरू आहे. या दुःखद घटनेत मृत्यू झालेल्या दोन्ही महिलांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. तपासातून घटनेमागील नेमकं कारण आणि संबंधित व्यक्तींची माहिती लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा आहे."

 


नेमकी घटना काय आहे?


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दोन महिला घरामध्ये गाढ झोपल्या होत्या. झोपेतच एका अज्ञात व्यक्तीने या दोन्हीही वयोवृद्ध महिलांची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केली. शेरेवाडी गावामध्ये हत्या झाल्याची माहिती मिळताच, गावातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांकडून उपलब्ध पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे घडली? हत्येमागील नक्की कारण काय? हत्येचा मुख्य मास्टरमाईंड कोण? अशा एक ना अनेक प्रश्नांचा उलगडा आता पोलिसांकडून केला जात आहे.

Comments
Add Comment

Baby Food Regulations : फॉर्म्युला दुधाच्या जाहिरातींवर बंदी; महाराष्ट्रात शिशु आहारासाठी नवे नियम लागू

मुंबई : राज्यातील शिशु पोषणासाठी वापरल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या उत्पादनापासून विक्री आणि

FDA Action: कसारा घाटात एफडीएने पाठलाग करत 1 कोटी 26 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत, गुप्त माहितीच्या आधारे रचला प्लॅन

ठाणे: अन्न- औषध प्रशासनाकडून (FDA)सोमवारी 27 सप्टेंबर 2026 रोजी, संपूर्ण राज्यात प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला

Recruitment Exam Reform : भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा; 30 हजार सूचनांनंतर टास्क फोर्सचा सखोल अभ्यास

मुंबई : राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, प्रभावी आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाने गठित

Mango Haapus News: हापूससह आंब्याच्या प्रमुख जातींची ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद होणार, कुठे करायची नोंदणी?

मुंबई: कोकणाची ओळख असलेल्या हापूस आंब्यासह महाराष्ट्रातील प्रमुख आंबा जातींची ई-पीक पाहणीमध्ये स्वतंत्रपणे

Maharashtra News: कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या थांबणार, सरकार थेट तुमच्या दारी...

मुंबई: विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे आणि प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून

Dattatray Bharne : महाराष्ट्राच्या रबी हंगामासाठी केंद्राकडे विशेष उपाययोजनांची मागणी; यांत्रिकीकरण-सूक्ष्म सिंचनासाठी ₹500 कोटींचा निधी

मुंबई : महाराष्ट्रातील काही भागांत कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आगामी रबी