ठाणे: अन्न- औषध प्रशासनाकडून (FDA)सोमवारी 27 सप्टेंबर 2026 रोजी, संपूर्ण राज्यात प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या चोरट्या वाहतुकीविरुद्ध एक मोठी कारवाई केली आहे. अन्न व औपध प्रशासनाला मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सोमवारी पालघर मार्गे 2 ट्रक प्रतिबंधित अन्नपदार्थ घेऊन भिवंडी, ठाणे येथे जाणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती.
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 93 व्या गणेशोत्सवात भक्तांनी मोठ्या श्रद्धेने दान अर्पण केले. 14 सप्टेंबर ते 28 ...
पहिली गाडी चारोटी टोल नाक्याजवळ जेरबंद करण्यात एफडीए प्रशासनाला यश आलं. काल ठाणेचे विशेष पथक पालघर परिसरात छापा टाकण्यासाठी दबा धरून बसले होते. सोमवारी 28 सप्टेंबर रोजी सकाळी 07.04 वाजता पहिली संशयास्पद MH 43 Y 7911 गाडी चारोटी टोल नाका ओलांडून पुढे जाताच पथकाने थांबवून तिची झाडाझडती घेतली. तपासणी दरम्यान ट्रकमधून 50 लाखांचा मुद्देमाल आढळून आला. त्या गाडीमध्ये प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणावर होता. गाडीची झाडाझडती घेतल्यानंतर ठाणे पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलेय.
मुंबई: हॉटेल- रेस्टॉरंटमध्ये बऱ्याचदा अस्वच्छता, किळसवाण्या पद्धतीने जेवण बनवणं आणि अनेक स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे सध्या एफडीएकडून ...
दुसऱ्या ट्रकचा आचाड नाक्यावरून पळ काढण्याचा प्रयत्न होता. पहिली गाडी पकडली गेल्याचे लक्षात येताच, काही अंतरावरून मागून येत असलेल्या MH 48 DQ 3624 ह्या दुसऱ्या गाडीच्या चालकाने आचाड नाका (पालघर) येथून तात्काळ गाडी यु-टर्न घेऊन पुन्हा गुजरात राज्याच्या हद्दीत पळवून नेण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळानंतर ही गाडी गुजरातमधून नाशिक-कसारा मार्गे भिवंडी, ठाणे येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार, तात्काळ, दुसरे पथक कसारा घाटाकडे रवाना करण्यात आले. त्यानंतर, दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत (जिल्हा ठाणे) दुसरी गाडी अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला.
ठाणे: मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंबंधित महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये बुलेट ट्रेनचा महाराष्ट्रातील पहिला- ...
संपूर्ण राज्यात प्रतिबंधित करण्यात आलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या चोरट्या वाहतूक व साठवणुकीविरुद्ध अन्न- औषध प्रशासनाने दोन स्वतंत्र ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. या दोन्ही कारवायांत मिळून एकूण 85 लाख 64 हजार 400 रूपयांच्या किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आणि 41 लाख किंमतीचे दोन बंदिस्त आयशर ट्रक असा एकूण 1 कोटी 26 लाख 64 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कसारा पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध रीतसर गुन्हा नोंदवून मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अन्न- औषध प्रशासनामार्फत प्रतिबंधित अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्या दुकानांविरोधात नियमितपणे तपासणी व कायदेशीर कारवाई केल्या जात आहेत.