77th Independence Day: पंतप्रधान मोदी सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला करणार संबोधित

नवी दिल्ली: भारताचा आज ७७वा स्वातंत्र्यदिन. ज्या देशभक्तांनी आपले रक्त सांडून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या आठवणीचा आजचा दिवस. संपूर्ण देश या देशभक्तीच्या रंगात आज रंगला आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणाऱ्या ७७व्या स्वातंत्र्य दिनाची तयारीही पूर्ण झाली आहे. येथे आज पंतप्रधान मोदी ध्वजारोहण करतील आणि देशाला संबोधित करतील.


पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सलग १०व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी लाल किल्ल्यावरील त्यांचे हे शेवटचे भाषण असेल.लाल किल्ल्यावर पोहोचताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव गिरिधर अरामने त्यांचे स्वागत करतली. पीएम यांच्या गार्ड ऑफ ऑनर दलात सेना, नौसेना आणि दिल्ली पोलिसांचे एकएक अधिकारी सामील असतील.



असा असेल कार्यक्रम


सकाळी ७.०६ वाजता - पंतप्रधान राजघाट येथे पोहोचल्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना पुष्पांजली अर्पण करणार
सकाळी ७.०८ वाजता - संरक्षण राज्य मंत्री पोहोचतील.
सकाळी ७.११ वाजता - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पोहोचतील.
सकाळी ७.१८ वाजता - पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन. आणि त्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार.
सकाळी ७.३० वाजता पंतप्रधान ध्वजारोहण करतील. यानंतर २१ तोफांची सलामी दिली जाईल.
सकाळी ७.३३ वाजता - पंतप्रधान देशाला संबोधित करतील.


सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगा फडकावल्यानंतर देशाला संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वार्षिक कार्यक्रमात सरकार आपले रिपोर्ट कार्ड, तसेच प्रमुख योजनांचे अनावरण आणि देशासाठी आपला भावी दृष्टिकोन या मुद्द्यांवर बोलतील.

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?