Wamanrao Pai : आकार व संस्कार


  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


माणसा-माणसांत जो भेद आहे तो फक्त दोनच ठिकाणी आहे. आकार व संस्कारामुळे हा भेद आहे. आकार व संस्कार दोन्ही वाईट नाही. आकार वाईट नाही व संस्कार वाईट नाही. आकार वेगळा नसेल, तर ओळखणार कसे? संस्कार नसेल, तर काहीच करता येणार नाही म्हणून आकार व संस्कार दोन्ही वाईट नाही. वाईट आहे ते श्रेष्ठ व कनिष्ठ हा भेदाभेद अमंगळ आहे. हे अमंगळ जाईल तेव्हा सर्व मंगल होईल, सर्व चांगले होईल, सर्व सुंदर सुरेख होईल, तिथेच स्वर्ग असेल. मेल्यानंतर स्वर्गात जाण्याची इच्छा करतात, त्यांच्याइतके मूर्ख या जगात दुसरे कुणी नाही.


ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ‘मेल्यानंतर मोक्ष मिळती असे म्हणती ते अतिमूर्ख.‘ मेल्यानंतर स्वर्ग पाहिजे, मोक्ष पाहिजे असे म्हणणारे मूर्ख असतात. इथेच स्वर्ग निर्माण करा. नरक तो निर्माण होतोच आहे. तो वेगळा करायला नको. सगळी व्यसन, दारू, गर्द, गुटखा याने नरक इथेच निर्माण होतो आहे. दारू पिणारा नवरा बायकोला मारतो, मुलांना मारतो, बायको एका बाजूला रडत बसली आहे, मुले कोपऱ्यात घाबरून बसली आहेत याला काय संसार म्हणतात? हा असा संसार म्हणजे नरक झाला. यावर उपाय म्हणून जीवनविद्या सांगते की, “आनंद वाटा आनंद लुटा.”एकमेकांना सुखी करा. एकमेकांना आनंद देण्याचा प्रयत्न करायला लागलात, तर संसारात सुखच सुख. कुटुंबात सुखच सुख आनंदी आनंद. स्वर्ग व नरक हे मेल्यानंतर नाही, तर इथेच आहेत. स्वर्गात जायला नको व नरकात, तर नकोच नको. स्वर्ग व नरक हे इथेच आहेत हे लक्षात ठेवले, तर आपण आपल्या जीवनात बदल केला पाहिजे. जीवनविद्या म्हणजे काय? समाजपरिवर्तन करणे हे जीवनविद्येचे ध्येय आहे. हे जग सुखी कधी होईल? समाजपरिवर्तन होईल तेव्हा. आज समाजपरिवर्तन होत नाही कारण धर्माधर्मामध्ये अंधश्रद्धा खूप आहेत. त्यामुळे मानसिकता बिघडलेली आहे. सगळीकडे अंदाधुंदी झालेली आहे. स्वर्ग निर्माण कोण करतो? आपण. नरक निर्माण कोण करतो? आपण. म्हणूनच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे सगळे आपल्या हातात आहे.


लहान मूल जन्माला आले की, त्याला तू माणूस आहेस हा पहिला संस्कार करा. सगळी तुझी भावंडे आहेत, हा संस्कार करा. हिंदू धर्मात हा संस्कार आहे, पण त्याचे पालन लोक करत नाहीत. मुस्लीम धर्मात हा संस्कार आहे, पण त्याचे लोक पालन करत नाहीत. बौद्ध धर्मात हा संस्कार आहे, पण त्याचे लोक पालन करत नाहीत. बुद्धांनी सर्व चांगले चांगले सांगितले पण त्याचे पालन कोण करतो? धर्म एक सांगतो व त्याचे बहुतांशी अनुयायी भलतेच काहीतरी करत बसले आहेत. जगातल्या कुठल्याही धर्माला दोष देण्याचे कारण नाही. दोषी आहेत ते अनुयायी. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितले माणसे वाईट नाहीत, वाईट आहे ती वृत्ती.“जे खळांचे व्यंकटी सांडो.” कुठलाही धर्म वाईट नाही. अमंगल आहे ते श्रेष्ठ व कनिष्ठ. हे कधी होते? हे संस्काराने होते, यासाठी संस्कार चांगलेच पाहिजेत. हे संस्कार चांगले करायचे की न करायचे हे तू ठरव म्हणून तूच आहेस ‘तुझ्या जीवनाचा शिल्पकार’.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये