मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळणार

मंगळवारी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात कायदा होण्याची शक्यता


मुंबई : निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला. त्यावर येत्या मंगळवारी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात चर्चा करून मराठा समाजास १० टक्के आरक्षण देण्याबाबतचा कायदा करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.


कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.


कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन त्यांना इतर मागास प्रवर्गाच्या सवर्गाचे आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे.


मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करण्यात आले होते. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगामार्फत गोखले इन्स्टिटय़ूट, आयआयपीएस या नामांकित संस्थांच्या सहाय्याने २३ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले.


राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule News: महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरच घेतला चटणी भाकरीचा आस्वाद

अकोला: महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आज दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. राज्यामध्ये पडलेल्या दुष्काळाचा पाहणीदौरा

आंबा-काजू उत्पादकांसाठी एआय आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प - मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : बदलत्या हवामानाचा आंबा आणि काजू पिकांना बसणारा फटका कमी करण्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना आता

ते तीन जण किल्ल्यावर अडकले, दगडफेक केली; अखेर बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले

पुण्यातील मावळ तालुक्यातील तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. रात्री उशिरा केलेल्या

मराठीला स्वाभिमान आणि भावनेपुरते मर्यादीत न ठेवता ज्ञान भाषा बनविणे आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठी भाषा फक्त स्वाभिमान आणि भावनेचा विषय न राहता ज्ञानाची भाषा बनवायची असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या

Pankaj Bhoyar : सीजेपीच्या आंदोलनात असामाजिक घटकांची घुसखोरी ?

- संशयितांचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती मुंबई : मुख्य निवडणूक

पाऊस संपला, उकाडा वाढणार! मुंबईतून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी; IMD ची घोषणा

यंदा अत्यल्प पावसामुळे उकाडा आणि गर्मीने नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. अशातच आज (३ ऑक्टोबर २०२६) भारतीय हवामान