Horoscope: तब्बल ५४ वर्षांनंतर ८ एप्रिलला लागणारे सर्वात मोठे सूर्यग्रहण अतिशय प्रभावशाली!

'या' राशीच्या व्यक्तींचे उजळणार भाग्य; होणार मालामाल!


मुंबई : सूर्यग्रहण ( Solar Eclipse) आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असून शकतात. पण ज्योतिषशास्त्रात त्यांचे विशेष महत्त्व आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात. फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला ८ एप्रिल २०२४ रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे दहा वीस नव्हे तर तब्बल ५४ वर्षानंतर पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे. हिंदूधर्मात या कालावधीत कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. मात्र ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातून ८ एप्रिल रोजी असलेलं सूर्यग्रहण खूप खास असणार आहे.


८ एप्रिलचे सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नसले तरी ज्योतिषशास्त्रानुसार काही राशीसांठी हे ग्रहण शुभ आणि अनिष्ट फळ देणारे ठरणार आहे. राशीचक्रातल्या काही राशींसाठी हे सूर्यग्रहण अत्यंत शुभ आहे. 'या' राशीच्या व्यक्तींना चांगल्या बातम्या समजतील, करिअरमध्ये प्रगती होईल तसेच धनलाभाचे योग देखील आहेत. जाणून घ्या कोणत्या राशींवर ग्रहणाचा शुभ प्रभाव पडणार आहे.


मिथुन (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचा खूप फायदा होणार आहे. या काळात मिथुन राशीच्या लोकांना गुंतवणूक करण्यासाठी कालावधी अतिशय फलदायी असणार आहे. या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होणार आहे. करिअर आणि बिझनेस या दोन्ही क्षेत्रात तुम्हाला यश मिळण्याची मोठी संधी आहे.


धनु (Sagittarius)


या काळात धनु राशीतील लोकांना त्यांचे करिअर आणि व्यवसायात खूप फायदा होणार आहे. अविवाहित तरुण/तरुणांसाठी लग्नाचा योग जुळून येणार आहे. जर तुम्ही भागीदारीत काम केले तर तुम्हाला अधिक नफा मिळेल.


मकर (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूप शुभ राहील. या काळात तुमचे अडकलेले पैसे परत येऊ शकतात. वैवाहिक जीवनात संबंध सुधारतील. तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.


मीन (Pisces)


वर्षातील पहिले सूर्यग्रहण मीन राशीत होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी सूर्यग्रहणाचा दिवस शुभ राहील. या काळात तुमचे संबंध सुधारतील. गैरसमज दूर होतील. नोकरीत बदल होऊ शकतो.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''