Pune Crime : पुण्यात नेमकं चाललंय काय? सलग चौथ्या दिवशी गोळीबाराने येरवडा हादरलं!

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Pune Crime) प्रचंड वाढ झाली आहे. पुण्यात शिकत असलेल्या तरुणांवर एकतर्फी प्रेमातून कोयता हल्ल्याच्या घटना किंवा पुण्यात सक्रिय असलेली कोयता गँग यामुळे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढीस लागलं आहे. त्यातच एक धक्कादायक घटना पुण्याच्या येरवडा भागात घडली आहे. पुण्यात सलग चौथ्या दिवशी येरवडा परिसरात पहाटेच्या वेळी गोळीबाराची घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भयंकर भीतीचं वातावरण पसरलं आहे.


येरवडा येथील अग्रेसन स्कूल समोर पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान गोळीबाराची घटना घडली. जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. आकाश चंदाले याने विकी चंदाले या दोघांवर गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आहे.



सलग चौथ्या दिवशी गोळीबार


पुण्यात याआधी जंगली महाराज रोड, हडपसर, सिंहगड रोडवर गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. जंगली महाराज रोडवर धीरज दिनेशचंद्र आरगडे बांधकाम व्यावसायिकावर स्विगीचे वस्त्र परिधान करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. तर हडपसरमधील शेवाळेवाडी येथे ठेकेदारीच्या वादातून दोन सैनिकांमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार झाला. यापूर्वी देखील सतत पुण्यात अशा गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. या घटना लागोपाठ घडत असल्यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची