नागपुर मतदारसंघात दोन लाख मतदारांची नावे गायब

भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे मागणार न्यायालयात दाद


नागपुर : नागपूर येथील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास प्रत्येकी १५ ते २० हजार अशा पद्धतीने नागपूर मधील लोकसभा मतदारसंघांमध्ये जवळपास दोन लाख मतदारांची नावे गहाळ झाल्याचा दावा आज (मंगळवार) भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी केला आहे. याबद्दल प्रशासकीय अधिकारी यांना निलंबित करावे अशी मागणी करत याबाबत प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे कुकडे यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले.


नागपुरात झालेला कमी मतदान आणि त्यासाठी मतदार याद्यांमधील गोंधळ जबाबदार असल्याच्या मुद्द्यावरून प्रशासनावर खापर फोडले जात आहे. हा सारा प्रकार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामुळे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी पत्रकार परिषद घेत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.


कुकडे म्हणाले नागपूर लोकसभा मतदारसंघांत सुमारे २ लाखाच्या घरात मतदारांची नावे गहाळ झाली आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांत सुमारे २० हजार नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. ज्या मतदारांना मतदान करता आले नाही किंवा ज्यांना मतदानासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले अशा मतदारांकडून माहिती गोळा केली जात आहे. ही माहिती प्राप्त होताच प्रसंगी भाजप विधी आघाडीकडून न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही बंटी कुकडे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

 Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट 2026

Pune News: "वय केवळ आकडा..." पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत आजींचा भन्नाट डान्स; पाहा Video

पुणे: नुकतंच आपण सर्वांनी गणरायाला जड अंत:करणाने भावपूर्ण निरोप दिला. अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जनासाठी

दुष्काळग्रस्त तालुक्यांना सरसकट मदत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळं काही स्पष्ट सांगितलं

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. हाताशी आलेलं पिक करपून जात

ST Buses : आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचणार लालपरी! दुर्गम भागासाठी 100 मिडी बसेस धावणार

मुंबई : महाराष्ट्रातील दुर्गम, डोंगराळ आणि अरुंद रस्त्यांच्या भागात राहणाऱ्या आदिवासी नागरिक आणि

ReelStar Divya Shinde : डॉक्टरच्या घरात घुसली आणि... रिलस्टार दिव्या शिंदेवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यात  (Pune) सोशल मीडिया रीलस्टार दिव्या शिंदे  (Divya Shinde) हिच्याविरोधात गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाने घेतला ब्रेक! 27 सप्टेंबरला कसा राहील हवामानाचा अंदाज?

महाराष्ट्रातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत असून अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. काही ठिकाणी