Pune News: "वय केवळ आकडा..." पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत आजींचा भन्नाट डान्स; पाहा Video

पुणे: नुकतंच आपण सर्वांनी गणरायाला जड अंत:करणाने भावपूर्ण निरोप दिला. अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जनासाठी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. या गणेश मिरवणुकींतील अनेक सीन्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच सध्या पुण्यातील आजींचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये आजींनी आपल्या जबरदस्त डान्सने सर्वांचेच मन जिंकले आहे. आजींनी थेट ट्रॅक्टरच्या बोनटवर उभं राहून तरूणाईंच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे. पुणे शहरामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. विसर्जन मिरवणुकीमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने पुणेकर सहभागी होऊन सणाचा आनंद द्विगुणित करतात.



पुण्यामध्ये दरवर्षी अनेक तरूण- तरूणी किंवा वयोवृद्ध व्यक्ती आपल्या हटक्या कलाकृतीने नागरिकांचे मन जिंकून घेतात. अशातच यावर्षी सुद्धा एका आजींना सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या मनामध्ये घर निर्माण केलं आहे. पुण्यातील एका सार्वजनिक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टरवर उभं राहून डान्स करत सर्वांचेच लक्ष वेधलेय. हिरव्या रंगाच्या काठा पदराची साडी नेसून आजींनी "आनंद पोटात माझ्या माईना..." या गाण्यावर मिश्किल पद्धतीने डान्स केला आहे. तरूणाईसोबत थिरकत आजींनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या आजींचा डान्सचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. आजींच्या डान्सचं अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

 



नेमक्या कोणत्या गणेश मंडळाच्या मिरवणुकीतला हा व्हिडिओ याबद्दलची माहिती कळू शकलेली नाही. परंतु आजींच्या डान्सने पुणेकरांचे लक्ष वेधले आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकींतील अनेक व्हिडिओज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यापैकीच हा देखील व्हिडिओ आहे. आजींसोबत अनेक तरूणाई सुद्धा ठेका धरताना दिसत आहे. सर्वच वयोगटातील भाविकांनी गणेश मिरवणुकीमध्ये ठेका धरला आहे. आजींनी मनमुराद डान्स करत आपला आनंद द्विगुणित केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्स "वय केवळ आकडा..." अशी कमेंट करताना दिसत आहेत.

Comments
Add Comment

दुष्काळग्रस्त तालुक्यांना सरसकट मदत करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळं काही स्पष्ट सांगितलं

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. हाताशी आलेलं पिक करपून जात

ST Buses : आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचणार लालपरी! दुर्गम भागासाठी 100 मिडी बसेस धावणार

मुंबई : महाराष्ट्रातील दुर्गम, डोंगराळ आणि अरुंद रस्त्यांच्या भागात राहणाऱ्या आदिवासी नागरिक आणि

ReelStar Divya Shinde : डॉक्टरच्या घरात घुसली आणि... रिलस्टार दिव्या शिंदेवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यात  (Pune) सोशल मीडिया रीलस्टार दिव्या शिंदे  (Divya Shinde) हिच्याविरोधात गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाने घेतला ब्रेक! 27 सप्टेंबरला कसा राहील हवामानाचा अंदाज?

महाराष्ट्रातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत असून अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. काही ठिकाणी

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कंटेनरला कारची धडक, एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये शनिवारी (ता. 26) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण

Ganeshotsav 2026 : महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची परदेशी पर्यटकांनाही भुरळ; बाप्पाच्या विसर्जनात उत्साहाने सहभाग

मुंबई : मुंबईतील गिरगाव चौपाटीवर झालेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात 23 देशांतील आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी उत्साहाने