महाराष्ट्रातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत असून अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत असल्या तरी राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झालेला नाही. अनेक भागांत कोरडे, दमट आणि ढगाळ वातावरण आहे. 27 सप्टेंबर रोजी राज्यातील कोणत्याही भागासाठी मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. ( Maharashtra Weather)
मुंबई: गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक बायोपिकने चांगलाच धुमाकूळ घातला. त्या व्यक्तीच्या आयुष्य रूपेरी पडद्यावर पाहणं प्रेक्षकांच्या आवडीचा विषय ...
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाने काही दिवसांपासून उघडीप घेतली आहे. काही भागांत हलक्या सरींची शक्यता असली तरी जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. पुढील काही दिवसही या भागात अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे. ( weather forecast)
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हवामान कोरडे आणि दमट राहण्याची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या परिसरात मात्र काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यामुळे या भागातील पावसाची तूट कायम आहे. ( September 27 weather)
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. मात्र 27 सप्टेंबरला या जिल्ह्यांसाठी कोणताही मोठा पावसाचा अलर्ट नाही.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेडमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. लातूर आणि धाराशिवमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाची कमतरता असल्याने शेतीवर त्याचा परिणाम होत आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांतही पावसाने उघडीप घेतली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही भागांत उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.