काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितलं की, 'शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू आहेत. तसेच योग्य ती मदत सुरू केली आहे. याबाबतची प्रक्रिया आणखी वेगाने करत आहोत. शेतकऱ्यांना योग्य मदत देण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे. फार कमी तालुके आहेत, ज्यांची नावं यादीत नाही. त्या ठिकाणची देखील पाहणी केली जाईल. तेथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत समाविष्ट केलं जाईल. कोणताही शेतकरी सुटणार नाही, याची काळजी घेतली आहे. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणीही दूर करणार आहोत.'
🕛 12.14pm | 27-9-2026📍Nagpur.
LIVE | Press Conference#Maharashtra #Nagpurhttps://t.co/rHUjbOCoZP
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 27, 2026
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; स्थानिक लोकप्रतिनीधी आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई : दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकरी ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एल निनोबाबत प्रतिक्रिया
एल निनोच्या संकटामुळे राज्यावर दुष्काळाची स्थिती ओढावली आहे. ही स्थिती कधी दूर होईल? असा प्रश्नही आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, 'आता जे एल निनो आहे ते आणखी तीव्र होत जाणार आहे. फेब्रुवारीपर्यंत त्याची तीव्रता असेल. त्यानंतर त्याचा जोर ओसरेल. अशा पद्धतीचं पॅसिफिक ओशनचं हीटिंग असतं. फेब्रुवारीनंतर सौम्यता यायला सुरू होईल. त्यानंतर जोर कमी होईल. त्यामुळे आपल्याला सगळ्या प्रकारच्या तयारीत राहावे लागेल. एल निनोचा परिणाम वाढला. तर आपल्याला ज्या अडचणी येतील, त्यासाठी तयारीत राहावे लागेल.'