Kangana Ranaut : कंगना रणौतचा पुढचा प्लॅन; बॉलीवूडला करणार रामराम!

कंगनाच्या 'या' वक्तव्यामुळे आले चर्चेचे उधाण


मुंबई : देशभरात निवडणुकांची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना बड्या बड्या नेत्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच भाजपाकडून (BJP) उमेदवारी मिळालेली बॉलिवूडची क्विन कंगना रणौत (Kangana Ranaut) हीदेखील हिमाचलमधील मंडीमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर तिने जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रचारादरम्यान कंगनाने केलेल्या एका मोठ्या घोषणामुळे राजकीयसहित सिनेसृष्टीतील वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.



काय म्हणाली कंगना?


कंगनाने लोकसभा निवडणूक जिंकल्यास बॉलिवूड सोडणार असल्याची घोषणा केली. तिने बॉलिवूड सोडून पूर्णवेळ राजकारणाला वेळ देणार असल्याचं ठरवलं आहे. निवडणूक जिंकल्यास पुढे काय करणार, या प्रश्नावर कंगना म्हणाली की, 'मी सिनेमाच्या कामानेही कंटाळली आहे. मला राजकारणात यश मिळाल्यास, लोक सोबत राहतील, तर मी राजकारणच करेन. मी एकाच कामावर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहे'.


'लोकांना माझी गरज असेल, तर मी त्या दिशेने काम करेन. मला अनेक फिल्ममेकर म्हणाले की, 'राजकारणात नको जाऊ'. माझ्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी लोक म्हणत आहे की, हे योग्य नाही. मी प्रिविलेज आयुष्य जगले आहे. आता लोकांना जोडण्याची संधी मिळत आहे, त्यामुळे त्याला पूर्ण करु इच्छित आहे. लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, तुम्ही त्याला न्याय दिला पाहिजे' असेही कंगनाने म्हटले आहे.



राजकारण आणि सिनेसृष्टीत किती फरक आहे?


राजकारण आणि सिनेसृष्टीच्या प्रश्नावर अभिनेत्री कंगना म्हणाली, 'सिनेसृष्टी आणि राजकीय आयुष्य खूप वेगळं असतं. सिनेसृष्टीतील आयुष्य एक खोटं आयुष्य असतं. तिथे वेगळं आयुष्य भासवलं जातं. लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगळं आयुष्य भासवलं जातं. तर राजकारण हे एक वास्तव आहे. मी लोकसेवेत नवीन आहे. मला खूप काही शिकायचं आहे'.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''