CSK vs GT: गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांनी शतक ठोकलं, चेन्नईचं वादळ तब्बल ३५ धावांनी रोखलं...

CSK vs GT: नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. चेन्नईने गुजरातला फलंदाजीसाठी बोलावले. मात्र गुजरातला फलंदाजीला बोलवणे चेन्नईला महागात पडले. गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांनी शतकं ठोकली. शुभमन गिलने अवघ्या ५० चेंडुत शतक करत इतिहास रचला. तर त्या पाठोपाठ साई सुदर्शनने देखील ५१ चेंडुत १०३ धावा केल्या. सलामीच्या जोडीने केलेल्या ऐतिहासिक खेळीमुळे गुजरातने २३१ धावांचा डोंगर चेन्नईसमोर उभा केला.


गुजरातने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सलामी जोडी फक्त १-१ धावा करुन बाद झाली. तर तिसऱ्या नंबरवर खेळायला आलेला ऋतुराज गायकवाड पहिल्याच चेंडुवर परतला. त्यानंतर आलेल्या डॅरेल मिचेलने आक्रमक खेळी करत ३४ चेंडुत ६३ धावा बनवल्या. त्याच्यासोबत आलेल्या मोईन अलीने देखील ३६ चेंडुत ५६ बनवुन संघाला सामन्यात परत आणले. मोहित शर्माने केलेल्या गोलंदाजीसमोर चेन्नईचे फलंदाज असमर्थ ठरले. मोहितने ३ गडी बाद करत गुजरातला मागे खेचले. त्याच बरोबर राशिद खानने देखील २ गडी बाद केले.


शिवम दुबे आणि रविद्र जडेजाच्या खेळीने चेन्नईच्या संघाला आशेचा किरण दिसला. पण ही जोडी फार काळ टिकु शकली नाही. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या आगमनाने चाहते खुश तर झाले, पण तोपर्यंत सामना चेन्नईच्या हातातुन निसटला होता. धोनीने २६ धावा बनवत संघाला १९६ धावसंख्येपर्यत पोहचवले. त्यामुळे चेन्नईचा तब्बल ३५ धावांनी पराभव झाला.

Comments
Add Comment

CSK Head Coach: झहीर खान यलो आर्मीत! महेंद्रसिंह धोनीला आयपीएल 2027 स्पर्धेत करणार मार्गदर्शन

Mumbai : चेन्नई सुपर किंग्सने भारताचा माजी वेगवान डावखुरा गोलंदाज झहीर खान यांची २०२७ च्या इंडियन प्रीमियर लीग

India vs Japan: भारत-जापान टी20 सामना होणार की नाही? श्रेयस अय्यरचं टेन्शन वाढलं! नेमकं काय घडतंय?

Japan : एशियन गेम्स 2026 स्पर्धेपूर्वी भारत आणि जापान यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. हा सामना सानो स्टेडियमममध्ये

ETPL 2026 : अभिषेक बच्चनच्या ETPL मध्ये इतिहास; एडिनबर्ग कॅसल रॉकर्स ठरले पहिलेवहिले चॅम्पियन

अभिषेक बच्चनच्या स्वामित्व असलेल्या युरोपियन T20 प्रीमियर लीग (ETPL) मध्ये एडिनबर्ग कॅसल रॉकर्स संघाने इतिहास रचला

Asian Games 2026 : MMA सुचिका तारियालला 700 ग्रॅम वजन महागात पडलं, असा गमावला हातातला सामना

नागोया : एशियन गेम्स 2026 स्पर्धेची रंगत वाढत चालली आहे. भारताने या स्पर्धेत पदकांची लयलूट सुरू केली आहे. भारताच्या

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाचा इंडोनेशियावर १७-१ असा दणदणीत विजय

नागोया: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने आपले वर्चस्व कायम राखत आणखी एका धमाकेदार

Asian Games 2026 : सुचिका तरियालने रचला इतिहास ! मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये भारताला पहिलं कांस्यपदक

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये (MMA) इतिहास रचला आहे. 36 वर्षीय