Mumbai : चेन्नई सुपर किंग्सने भारताचा माजी वेगवान डावखुरा गोलंदाज झहीर खान यांची २०२७ च्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामासाठी नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली. चेन्नई सुपर किंग्स सोबत तब्बल १८ वर्षांचा संबंध असलेल्या स्टीफन फ्लेमिंग यांच्या जागी झहीर खानची नियुक्ती झाली आहे. चेन्नई संघात सामील होण्यापूर्वी , झहीर २०२५ च्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता , परंतु एका वर्षानंतर त्याने आपले पद सोडले. लवकरच ४८ वर्षांचा होणाऱ्या झहीरने भारतासाठी ९२ कसोटी, २०० एकदिवसीय आणि १७ टी-२० सामने खेळले आहेत. ऐतिहासिक २०११ विश्वचषक स्पर्धेत २१ बळी घेऊन तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. (CSK Head Coach)
मुंबई : आयआयटी मुंबईतील (IIT Bombay) 'ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी' विभागाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ...
भारतीय संघासाठी कामगिरी
भारताच्या २०११ च्या यशस्वी विश्वचषक मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या झहीरकडे सर्व फॉरमॅटचा दांडगा अनुभव आहे. त्याने १४ वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी ९२ कसोटी, २०० एकदिवसीय आणि १७ टी-२० सामने खेळले आहेत. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटीत ३११ आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये २८२ बळी घेतले आहेत. (CSK Head Coach)
सिंधुदुर्ग : राज्यातील काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाशी ...
चेपॉकमधील वातावरण आवडतं
आयपीएलमध्ये झहीरने १०० सामने खेळले असून, निवृत्तीनंतर त्याने प्रशिक्षणाची भूमिका स्वीकारली आहे,” असे फ्रँचायझीने एका निवेदनात म्हटले आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एकाचा भाग होणे हा माझा सन्मान आहे. एक क्रिकेटपटू म्हणून, मी मैदानावर सीएसकेचा सामना केला आहे आणि त्या सामन्यांचा मनसोक्त आनंद घेतला आहे. चेपॉकमधील सुपरफॅन्सनी निर्माण केलेले वातावरण याला आणखी खास बनवते. इतका समृद्ध इतिहास असलेल्या या प्रतिष्ठित फ्रँचायझीमध्ये सामील होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे,” असे झहीर म्हणाला.