फडणवीस कायम! कोअर कमिटीला सोबत घ्या

महाराष्ट्रातील पराभवानंतर दिल्लीतील नेत्यांनी केल्या सूचना


नवी दिल्ली (वृत्तसंस्था): लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. देशात अब की बार ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या भाजपाचे दोन्ही विजयाचे स्वप्न भंगले. मात्र, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. पण, भाजपाला अपेक्षित असलेल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून सर्वात कमी जागा मिळाल्याने दिल्लीकरांनीही या पराभवाची कारणमिमांसा सुरू केली आहे. त्यातच, देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजप कोअर कमिटीची मंगळवारी दिल्लीत बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रात कोणा एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नाही, कोअर कमिटीला सोबत घ्या, अशा सूचनाच दिल्लीतील नेत्यांनी केल्या आहेत.


लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची विनंती केली होती. मात्र, भाजपाच्या वरिष्ठांनी त्यांना कायम राहण्याच्या सूचना करत, काम सुरुच ठेवा, असे सांगितले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला थांबवायचो असेल, तर भाजपाने एकत्रितपणे काम करायला हवे. महाराष्ट्रातील भाजपाच्या सर्वच जुन्या नेत्यांनी सक्रीय करायला हवे,’ अशा शब्दांत दिल्लीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील भाजपा नेतृत्वाची शाळा घेतली. विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागा, आत्तापासूनच उमेदवारांना तयारी सुरू ठेवायला सांगा. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा होऊ देऊ नका, महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणायची आहे, अशाही सूचना भाजपच्या वरिष्ठांनी कोअर कमिटीला केल्या आहेत.


सोशल मीडियातून विरोधकांना प्रत्युत्तर द्या


महाराष्ट्र भाजपाच्या सोशल मीडियावर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती आहे. सोशल मीडियात भाजपाविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडल्याचे मत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने व्यक्त केले. विरोधकांकडून जे मुद्दे सोशल माध्यमांमध्ये मांडले गेले आहेत, त्याला उत्तर देण्यात भाजपाचे राज्यातील नेते कमी का पडले?, अशी विचारणा दिल्लीश्वरांनी भाजपाच्या राज्यातील नेत्यांना केली आहे.


विधानसभा निवडणुकीत तरी विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा अधिक वापर करा, अशा सूचनाही राज्यातील नेत्यांना देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीकडून जो नेरेटीव्ह सेट करण्यात आला, त्याला सोशल मीडियातून प्रभावीपणे उत्तर देण्यात कमी पडल्याची जाणीवही भाजपा नेत्यांना करुन देण्यात आली आहे.


विधानसभेच्या रोडमॅपवर बैठकीत चर्चा


येत्या विधानसभेचा रोडमॅपवर देखील एक प्राथमिक चर्चा केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी अत्यंत मजबुतीने आपल्याला निवडणुकीत पुढे कसे जाता येईल? या संदर्भातली सगळी कार्यवाही ही येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत, असेही फडणवीस यांनी म्हटले.

Comments
Add Comment

बाप्पाच्या दर्शनासाठी Pune Metro सज्ज, गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; वाचा एका क्लिकवर वेळापत्रक

पुणे: गणेशोत्सवाच्या काळामध्ये, पुणेकरांना महामेट्रोकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई- पुण्यामध्ये गणेशोत्सवासाठी

MPSC Student Suicide : MPSCची तयारी, कर्जाचा ताण अन् नैराश्य; पुण्यात 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या

पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Pune Crime : लग्नाला काही महिनेच झाले... पतीच्या विवाहबाह्य संबंधांचा आरोप अन् २५ वर्षीय नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime : ज्या वयात नव्या संसाराची स्वप्नं रंगवायची, त्याच वयात एका नवविवाहितेने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक

Dadaji Bhuse : राज्यातील सर्व शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करणार; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

नागूपर : नागपूर येथील लालबहादूर शास्त्री हिंदी शाळेच्या धर्तीवर राज्यातील सर्व शाळांचा विकास करून त्या ‘मॉडेल

Pune MPSC Student Suicide: पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमधलं कारण वाचून सर्वच हादरले...

पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाने जीवन संपवल्याची

Justice Mahesh Chandra Tripathi : न्या. महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी बुधवारी लोकभवन येथे झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभात अलाहाबाद उच्च