कुठे आहे पाऊस? हवामान विभागाचे अतिवृष्टीचे इशारे ठरताहेत फोल, पण का?

पुणे : हवामान विभागाने गेल्या तीन दिवसांपासून कोकणात दिलेले अतिवृष्टीचे इशारे फोल ठरले आहेत. रविवारी मान्सूनने न बरसताच अवघे राज्य व्यापल्याची घोषणा हवामान विभागाने केली. अतिवृष्टीचे इशारे देऊनही मान्सून गायब असून उकाड्याने नागरिकांची काहिली होत आहे.


हवामान विभागाने २० जूनपासून राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचे जाहीर केले होते. यात कोकणात अतिवृष्टी, तर उर्वरित राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज दिला होता. मात्र तीन दिवस उलटून गेले, तरी त्या अंदाजानुसार मान्सून पडलाच नाही. उलट सगळीकडे चक्क कडक ऊन अजूनही पडत आहे. रविवारी राज्यातील बहुतांश भागांत कडक ऊन होते. सोमवारी देखिल हीच परिस्थिती सगळीकडे दिसून येते. उन्हामुळे पुन्हा घराघरांत पंखे, कुलर अन् एअर कंडिशनर सुरू झाले आहेत. अस्वस्थ करणाऱ्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत.



हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकात वादळी वारे ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने वाहत आहे. मात्र कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात खंडित स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. यात शनिवारी कोकणाला रेड, तर रविवार ते सोमवार ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात तेवढा पाऊसच पडला नाही. उर्वरित राज्याला यलो अलर्ट देण्यात आला होता. काही हवामान तज्ज्ञांच्या मते यंदा जूनमधील पाऊस हा खंडित स्वरूपाचा असून, हवेचा दाब असमान असल्याने तो कमी-जास्त प्रमाणात पडत आहे.



संपूर्ण अहवाल येथे पहा...


हवा ही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असते. समुद्र आणि महासागरावर जर हवेचा दाब १००७ ते १००८ हेक्टापास्कल इतका असेल, तर बाष्पयुक्त वाऱ्याचे वहन होण्यासाठी तो दाब १००३ ते १००४ इतका व्हावा लागतो. तेव्हाच बाष्प कमी दाबाच्या क्षेत्राकडे येतील. पण यंदा जूनअखेरपर्यंत खंडित पावसाचीच शक्यता दिसत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस जोर धरेल असे वाटते. कारण तोवर दाब कमी होईल असा अंदाज आहे, असे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

FDA Action In Mumbai: अन्न- औषध प्रशासनाने नायर हॉस्पिटलच्या कॅन्टीनला ठोकलं टाळं, १४ हॉटेल- रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई सुरू आहे. नागपुरामध्ये १२ लाखांचा गुटखा जप्त करत तीन आरोपींना

वैद्यकीय शिक्षणामध्ये राज्याची गरूडझेप, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर 'सहयोगी व आरोग्यसेवा परिषद' स्थापनेच्या कार्यवाहीला गती

मुंबई: राज्यातील आरोग्यसेवा आणखीन सुधारण्यासाठी आणि नागरिकांना उत्तम पद्धतीची सेवा लाभण्यासाठी वैद्यकीय

Ahilyanagar News: नगरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, यंदा सरकारी कॉलेज सुरू होणार

अहिल्यानगर: अहिल्यानगरमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, हे नगरकरांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले

Mumbai Filmcity News: फिल्मसिटीमध्ये मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे लोकार्पण

मुंबई: मुंबईतील गोरेगावमध्ये फिल्म सिटी अर्थात चित्रनगरी आहे. या चित्रनगरीमध्ये मराठीसह हिंदी भाषेतील

Nitesh Rane On Uddhav Thackeray: "आधी अंगावर लागलेला डाग पुसा, मग...", दिशा सालियन प्रकरणावरून मंत्री नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय दौरा काढणाऱ्या उद्धव

Nandurbar News : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आश्रमशाळेत आत्महत्या

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्राणी येथील अनुदानित