रोहिंग्या, बांगलादेशी शब्दांमुळे भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती


मुंबई : आमदार नितेश राणेंसह अन्य भाजप नेत्यांच्या विरोधात धार्मिक भावना भडकविल्याचा गुन्हा दाखल करू शकत नाही. कारण त्यांनी भाषणात वापरलेले 'रोहिंग्या' आणि 'बांगलादेशी' हे शब्द भारतीयांच्या किंवा येथे असलेल्या समाजाच्या भावना दुखावू शकत नाहीत,अशी माहिती पोलिसांनी उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.


नितेश राणे यांनी केलेल्या भाषणातून धार्मिक गटांमध्ये वैर आणि तेढ निर्माण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर चार गुन्हे दाखल केले आहेत. मानखुर्द पोलिस ठाण्यात नितेश राणे यांच्यावर आयपीसी २९५ (ए)अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र,अन्य प्रकरणांत हे कलम लावू शकत नाही, अशी माहिती मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाला दिली.


पोलिस आयुक्तांनी राणे यांची भाषणे ट्रान्सक्राईब केली. त्यात राणे यांच्यावर २९५ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही,असा निष्कर्ष पोलीस आयुक्तांनी काढला आहे, असे वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. भाषणात 'रोहिंग्या' आणि 'बांगलादेशी' असा उल्लेख आहे. कायद्यातील तरतूद भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आहे. 'रोहिंग्या' व 'बांगलादेशी' हे भारतीय नाहीत आणि त्यांनी देशात बेकायदा प्रवेश केला आहे. त्यामुळे हे शब्द भारतीयांच्या भावना दुखावणारे नाहीत, असा युक्तिवाद वेणेगावकर यांनी केला. पोलिस आयुक्तांनी भाषण तपासले असून सरकारी वकिलांचे म्हणणे आम्ही मान्य करतो, असे खंडपीठाने म्हटले.


आयपीसी कलम १५३ (ए)आणि १५३(बी)(धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व आणि असंतोष वाढविणे) अंतर्गत आरोपींवर खटला चालविण्यासाठी आवश्यक असलेली मंजुरी आठ आठवड्यांच्या आत पोलिस घेतील, असेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

Comments
Add Comment

Parth Pawar : पार्थ, सावध हो! 'सोमेश्वर'च्या निवडणुकीत बारामतीमधील भावनिक पत्राची चर्चा

- अजित पवार कुटुंबाला राजकीयदृष्ट्या बाजूला करण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रातून दावा मुंबई : बारामती

Jackie Shroff : जॅकी श्रॉफ यांनी घेतले 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चे दर्शन; बाप्पाच्या चरणी रोपटं अर्पण करत जपला निसर्गप्रेम

मुंबई : मुंबईच्या गणेशोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला असून सामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत

Ketan Agrawal Murder Case : 'त्या' फोटोंमुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवं वळण; पोलिसांना मिळाला सर्वात मोठा पुरावा!

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती आणखी काही महत्त्वाचे पुरावे

खासगी ट्रॅव्हलर्सला टक्कर देण्यासाठी MSRTC ची जबरदस्त शक्कल, 'असा' आहे मेगा प्लॅन!

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ (MSRTC) कडून स्वमालकीच्या ताफ्यात २०० नवीन वातानुकूलित व्होल्वो बसेस

Amravati Crime News : चार वर्षांचं लिव्ह-इन रिलेशनशिप अन् वारंवार भांडणं; अखेर बंद घरात वैशालीचा मृतदेह, काय आहे नेमकं प्रकरण ?

अमरावती : बडनेऱ्याजवळील दाभा परिसरात बंद घरातून ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. वैशाली असे

Pune News: बायकोला चकवा देणं पडलं महागात! मलेशिया ट्रीपचा असा झाला फज्जा; पुण्याच्या बिझनेसमनची भन्नाट कहाणी

पुणे: ४६ वर्षीय बिझनेसमनला पत्नीसोबत खोटं बोलून मलेशियाला जाणं चांगलंच महागात पडलं आहे. बिझनेसच्या कामानिमित्त