पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून ...
पुण्यातील ४६ वर्षीय बिझनेसमन १४ सप्टेंबरला त्याच्या मैत्रिणीसोबत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनलवरून मलेशिया (कुआला लंपूर)ला चालला होता. पण त्याने त्याच्या पत्नीला बिझनेसच्या कामानिमित्त मलेशियाला जात असल्याचं सांगितलं. पण त्यांची ही ट्रीप काही सक्सेस झाली नाही. विमानतळावर इमिग्रेशन चेकिंग केली जात असताना तिच्याकडे जुना पासपोर्ट असल्यामुळे तिला विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी रोखलं. त्या तरूणीने सादर केलेला पासपोर्ट हा जुना होता, ज्याबाबत तिने आधीच 'हरवला' असल्याची तक्रार नोंदवली होती. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी तिला या पासपोर्टवर प्रवास करता येणार नाही असे स्पष्ट सांगितले. मैत्रिणीवर कायदेशीर कारवाई होणार, या भितीने आणि माझ्यासोबत मैत्रिण आहे, हे पत्नीला कळेल या भितीने त्या बिझनेसमनची बोबडी वळाली. तिच्यासोबतच त्यानेही प्रवास रद्द केला.
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात परवडणाऱ्या घराच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास ...
आपण खोटं बोललोय, ही गोष्ट पत्नीला समजू नये म्हणून बिझनेसमनने थेट फोनच स्विच ऑफ करून टाकला. त्यानंतर त्याने विमानतळावरील लँडलाईन फोनवरून पत्नीला फोन करून सांगितले की, "इमिग्रेशनच्या समस्येमुळे मला माझा फोन जमा करावा लागत आहे." त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने पत्नीला व्हिडिओ कॉल होता, तो सुद्धा त्याने थोडक्यात आटोपला. तेव्हा सुद्धा इमिग्रेशनचं खोटं कारण सांगून त्याने कॉल आटोपता घेतला. त्यानंतर च्याचा फोन पूर्णपणे बंद झाला. ट्रीप रद्द झाल्यामुळे तो मैत्रिणीसोबत मुंबई सीएसएमटी स्थानकावर गेला. पतीसोबत बराच वेळ कोणताही संपर्क होत नसल्यामुळे आणि त्याला इमिग्रेशनच्या प्रोसेसमध्ये अडचण येत असल्यामुळे ती घाबरली. तिने लगेचच जवळच्या एका पोलीस ठाण्यामध्ये पतीच्या अपहरणाची एफआयआर तक्रार नोंदवली. पत्नीने आपल्या अपहरणाची तक्रार नोंदवल्याचे कळताच तो घाबरला.
नाशिक : परिस्थिती कितीही साधी असली, तरी मनात काहीतरी करण्याची जिद्द आणि नवी कल्पना साकारण्याची इच्छा असेल, तर व्यक्ती स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करू ...
बिझनेसमन स्वत: बुधवारी रात्री उशिरा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीतील सहार पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने पत्नीला बिझनेसचं खोटं कारण देत गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला फिरायला चालला होता. पत्नीला खरं काहीही कळू नये म्हणून, त्याने स्वत: इमिग्रेशनची खोटी कहाणी रचल्याची कबुली पोलिसांना दिली. सहार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने सर्व खरी माहिती दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला आहे. पोलीस अधिकारी म्हणाले, "आम्ही न्यायालयात 'सी समरी' (C Summary) क्लोजर रिपोर्ट दोन आठवड्यांच्या आत सादर करणार आहोत."