कॅम्लिन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन

मुंबई : `कॅम्लिन फाईन सायन्सेस`चे संस्थापक व `कोकुयो कॅम्लिन`चे मानद अध्यक्ष सुभाष ऊर्फ दादासाहेब दिगंबर दांडेकर यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा आशिष व मुलगी अनघा असा परिवार आहे. दांडेकर यांच्या निधनाबद्दल उद्योग व सामाजिक वर्तुळातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.


सुभाष दांडेकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दांडेकर परिवारातील सदस्य, कॅम्लिन समुहातील कर्मचारी व उद्योग क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.


सामाजिक भान, कलेची जाण व उद्यमशीलता अंगी बाळगणा-या सुभाष दांडेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला आहे.


सुभाष दांडेकर यांच्या सामाजिक दायित्त्वाच्या भूमिकेमुळे ते शुश्रुषा सिटिझन्स को-ऑप रुग्णालयाशी जोडले गेले. विविध सामाजिक संस्था तसेच `सिकॉम`सारख्या अनेक उद्योग संघटनांचे ते मार्गदर्शक बनले. `महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री`चे ते माजी अध्यक्ष होते. संबंधित क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना "गेम चेंजर्स ऑफ महाराष्ट्र", "लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड" अशा पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले.


कॅम्लिन शाई सुप्रसिद्ध आहे. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणे, पेन्सिल, मार्कर, शाई तसेच चित्रकार व अन्य कलाकारांना लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, कार्यालयीन उत्पादने आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती कॅम्लिन या कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यांच्या निधनाने एक उत्तम उद्योजक व रंगांचा जादूगार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.



महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सकडून श्रद्धांजली


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दांडेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'दांडेकर हे राज्याच्या उद्योग क्षेत्रातलं प्रमुख व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी हजारो मराठी उद्योजकांना बळ दिलं. अनेक तरुणांना रोजगार दिला. त्यांच्या रूपानं मोठा आधारवड गेल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात राज्यातील संपूर्ण उद्योग क्षेत्र सहभागी आहे, अशा शब्दांत ललित गांधी यांनी सुभाष दांडेकर यांना श्रद्धांजली वाहिली.

Comments
Add Comment

'मुंबई पुस्तक महोत्सव' संवेदना आणि माणुसकीचा उत्सव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात तंत्रज्ञानाचा वेग वाढत असला, तरी मानवी संवेदना, प्रेम आणि भावभावना

मुंबईत भारत-सायप्रस सागरी व्यवसाय मंच; जहाज बांधणी, हरित नौवहनात सहकार्यावर भर

सायप्रस प्रजासत्ताकाच्या नौवहन उपमंत्री मरीना हाजीमानोलिस यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने आज मुंबईत

Mission Pedestrian First: महापालिका आयुक्तांच्या ‘मिशन पेडेस्ट्रियन फर्स्ट’लाच अधिकारीच घालतात खिळ?

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पदपथावरील अतिक्रमण हटवले जाते, पादचारी मुक्त झाले पदपथ बनवले जातात, पण काही दिवसांतच

येत्या गुरुवारी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांत घेतला जाणार 24 तासांचा पाणीब्लॉक, कोणकोणत्या परिसरात बंद असेल पाणी पुरवठा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक 1 ते सहार गाव दरम्यान विविध ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांवरील

Safe Parks Safe Cities: उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागांची सुरक्षा वाढवणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): कुर्ला येथील उद्यानानातील तरुण तरुणीला काही अल्पवयीय मुलांकडून झालेल्या मारहाणीच्या

Mumbai Local News : प्रवाशांचा थरकाप: झोपमोड झाल्याचा राग अनावर; प्रवाशाने केसांत लपवलेल्या ब्लेडने केला स्वतःवर हल्ला

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना घडली