साबरमती एक्स्प्रेसचे डबे घसरले, जीवितहानी टळली, पण गाडीचे नुकसान

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा कानपूर आणि भीमसेन स्थानकांदरम्यान साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. लोको पायलटने दिलेल्या माहितीनुसार रूळावरील वस्तूला इंजिनची धडक बसल्यामुळे सदर अपघात झाला.


प्राथमिक माहितीनुसार, दगड इंजिनवर आदळल्याचे चालक सांगत आहेत. इंजिनच्या कॅटल गार्डचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण ट्रेनचे नुकसान झाले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


घटनास्थळी पोहोचलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाडी क्रमांक 19168 साबरमती एक्स्प्रेस वाराणसीहून अहमदाबादला जात असताना कानपूर आणि भीमसेन स्थानकादरम्यान रुळावरून घसरली. कानपूरजवळील गोविंद पुरीसमोर होल्डिंग लाइनवर ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. ही ट्रेन वाराणसीहून अहमदाबादला जात होती. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान साबरमती एक्स्प्रेस ट्रेनमधील सर्व प्रवाशांना अपघातस्थळावरून बसने कानपूरला आणण्यात आले. तिथून त्यांची अहमदाबादला जाण्याची व्यवस्था केली जात आहे.


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, रेल्वेचे इंजिन रुळावर ठेवलेल्या जड वस्तूला धडकले. इंजिनाला जोरदार धडक लागल्याच्या खुणा आहेत. पुरावे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. आयबी आणि यूपी पोलीस तपास करत आहेत.


उत्तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक उपेंद्र चंद्र जोशी म्हणाले, इंजिनावर काहीतरी आदळल्याने हा अपघात झाल्याचे निश्चित आहे. घटनास्थळी काहीही आढळून आले नाही. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग ७० ते ८० च्या दरम्यान होता. एक चाक बंद पडताच दाब कमी झाला. चालकाने वेळीच आपत्कालीन ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली.


कानपूरचे उपजिल्हाधिकारी राकेश वर्मा यांनी सांगितले की, २२ डबे रूळावरून खाली घसरल्याचे दिसत आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.


रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अपघातामुळे या मार्गावरील सात ट्रेन रद्द, तर तीन ट्रेन इतर मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत.


भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यासाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

Comments
Add Comment

West Bengal Name : पश्चिम बंगाल आता ‘पश्चिम बंग’ होणार? विधानसभेत मांडणार नामांतर प्रस्ताव

२००१ मध्ये कलकत्त्याचे नाव बदलून कोलकाता ठेवल्यानंतर पंचवीस वर्षांनी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा नामांतर

China to Bangladesh ship seized Indonesia : चीनहून बांगलादेशला जाणारे जहाज इंडोनेशियात जप्त; ४०५ टन रसायन आणि लाखो सिम कार्ड्स सापडली

जकार्ता : चीनमधून बांगलादेशकडे निघालेल्या एका मालवाहू जहाजाला इंडोनेशियाच्या नौदलाने पकडले आहे. या जहाजातून

PM Modi gift to Balen Shah : बालेन शाह यांना मोदींची भन्नाट भेट; संपूर्ण रामायण, बनारसी ब्रोकेड आणि गंगाजलाचा नेमका अर्थ काय ?

नवी दिल्ली : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह सध्या भारत दौऱ्यावर आले असून, सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी

कर्नाटकातील शाळांमध्ये मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स; नियम न पाळल्यास कारवाई

कर्नाटक सरकारने शाळकरी मुलींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातील शासकीय, अनुदानित आणि खाजगी

West Bengal Government : पश्चिम बंगालमधील बेरोजगार तरुणांना दरमहा 2,000 रुपयांपर्यंत भत्ता; जानेवारीपासून नव्या योजनेची अंमलबजावणी

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ‘भोरशा

Jama Masjid Police Station Attack : मोठी बातमी : जामा मस्जिद पोलीस ठाण्यात आरोपीचा चाकूने हल्ला; पाच पोलीस जखमी, आरोपीवर गोळीबार

नवी दिल्ली : दिल्लीतील जामा मस्जिद पोलीस ठाण्यामध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने थेट पोलिसांवर