युक्रेन-रशिया युद्धात उत्तर कोरियाही उतरला, पाठविले १२ हजार सैनिक

दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा


सेऊल : युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी उत्तर कोरियाने आपले १२,००० सैन्य पाठविले आहे. यामध्ये तगड्या सैन्य तुकडीचा विशेष मोहिमांसाठी समावेश असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांनी दिली आहे.


योनहापने राष्ट्रीय गुप्तचर सेवे (एनआयएस)च्या हवाल्याने म्हटलंय की, रशियाला मदत करण्यासाठी उत्तर कोरियाचे सैन्य आधीच रवाना झाले आहेत. हे माहिती समोर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांनी तातडीची बैठक घेतली.


दक्षिण कोरियाच्या कार्यालयाने केलेल्या निवेदनानुसार, उत्तर कोरियाकडून सैन्य पाठवणे हा दक्षिण कोरिया आणि जगाच्या सुरक्षेला गंभीर धोका असल्याची भीती बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आता या घडामोडींमुळे तणावामध्ये आणखी वाढ झाली आहे.




महायुद्ध : झेलेन्स्की


युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितलंय की, युक्रेनच्या विरुद्ध लढणाऱ्या रशियन सैन्याला मदत करण्यासाठी १०,००० उत्तर कोरियाचे सैन्य तयार केले जात असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली आहे. जर यामध्ये तिसरा देश युद्धात सामील झाला तर संघर्ष “महायुद्धात” बदलू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.



अशीही मदत...


नाटोचे महासचिव मार्क रटे यांनी म्हटलंय की, आमच्याकडे उत्तर कोरियाचे सैन्य युद्धात सहभागी झाल्याचा कोणताही पुरावा नाही आहे. मात्र, रशियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा, युद्धात पाठिंबा देण्यासाठी तांत्रिक पुरवठा अशा अनेक मार्गांनी उत्तर कोरिया मदत करत आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे, असे त्यांनी सांगितले.



ओलिसांना साेडणार नाही : हमास


- ७ ऑक्टाेबर २०२३ राेजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हमासचा म्हाेरक्या याह्या सिनवार ठार झाल्याचे हमासने मान्य केले.


- शस्त्रसंधी जाेपर्यंत हाेत नाही, ताेपर्यंत इस्रायलच्या ओलीस नागरिकांची सुटका करणार नसल्याचे हमासने जाहीर केलं आहे. तर, दुसरीकडे इस्रायलने युद्ध सुरूच ठेवण्याच ठरवलं आहे.


पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ व २३ ऑक्टोबर रोजी ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी या परिषदेसाठी निमंत्रित केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.


ब्रिक्स पश्चिमविरोधी नाही : पुतिन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी कोणाला विरोध करणे हा ब्रिक्सचा उद्देश नसल्याचा दावा त्यांनी शुक्रवारी केला. ब्रिक्स हा पश्चिमेत्तर गट जरी असला तरी त्याचा पश्चिम देशांना विरोध नसल्याचे पुतिन यांनी म्हटलंय.


ब्रिक्स परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रशियातील कझान येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यादरम्यान ते अनेक नेत्यांशी चर्चादेखील करतील. ही भेट युद्ध सुरू असताना होत असल्याने ही परिषद महत्त्वाची मानली जाते आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत दौऱ्यावर; मोदी आणि मुर्मू यांना देणार खास मूर्तिभेट

Narendra Modi: नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या

Canada Crime: कॅनडात भारतीय जोडप्याची गोळ्या झाडून हत्या; वॉलमार्ट पार्किंगमध्ये रक्तरंजित घटना

कॅनडाच्या सरे येथील वॉलमार्ट स्टोअरबाहेर भारतीय वंशाच्या एका जोडप्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून हा

Iran Attacks on America: इराण-अमेरिका संघर्ष पेटला? बहरीनमधील अमेरिकी रडार आणि तेलवाहू जहाजांवर हल्ले

पश्चिम आशियामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड

Goldy Brar News: अमेरिका-कॅनडाच्या मोस्ट वॉन्टेड यादीत गोल्डी ब्रार! पकडण्यासाठी 8.5 कोटींचे बक्षीस

Goldy Brar: लॉरेन्स बिश्नोई गँगमधील कुख्यात गुंड गोल्डी ब्रार याला अमेरिकेच्या 10 मोस्ट वॉन्टेड फरार आरोपींच्या स्थान

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक, कमी व्याजदरावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हची केली कानउघाडणी

मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या कमी व्याजदरांची प्रशंसा केली असून अमेरिकेच्या

NVIDIA Chip Smuggling : NVIDIA चे माजी वरिष्ठ अधिकारी जय पुरी यांच्या पत्नीचा चिप तस्करी प्रकरणाशी संबंध ? मडी वॉटर्सच्या अहवालाने तंत्रज्ञान विश्वात खळबळ

नवी दिल्ली : एआय (AI) क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मानल्या जाणाऱ्या 'एनव्हीडिया'चे (Nvidia) माजी वरिष्ठ अधिकारी अजय के.