Israel: इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याविरोधात न्यायालयाने जारी केला अटक वॉरंट

जेरुसलेम: इस्रायलचे(israel) पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट यांच्यावर इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने (आयसीसी) युद्ध गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गंभीर आरोपांसाठी अटक वॉरंट जारी केले आहे.


गाझा पट्टीत युद्धकाळात सामान्य नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांसाठी आयसीसीने नेतान्याहू आणि गॅलंट यांच्यावर हत्या, शोषण आणि अमानवीय कृत्यांबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. इस्रायलने गाझातील नागरिकांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधा रोखल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू आणि संकटांना सामोरे जावे लागल्याचे आरोप केले आहेत. यात लहान मुलांचा मृत्यू आणि मानवीय त्रासाचे पुरावे आढळल्याचे कोर्टाने नमूद केले आहे.


आयसीसीच्या अहवालानुसार, नेतान्याहू यांनी जाणूनबुजून सामान्य नागरिकांना लक्ष्य बनविले, याबाबतचे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. दरम्यान, गाझातील युद्धबंदीबाबत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. हमासचे गाझा प्रमुख खलील अल-हय्या यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत युद्धबंदी होत नाही, तोपर्यंत कैद्यांची अदलाबदल होणार नाही. अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विनाअट युद्धबंदी प्रस्तावावर व्हेटो लावला आहे. मात्र, ओलीसांची सुटका करणाऱ्या प्रस्तावाला अमेरिकेने समर्थन दिले आहे.


गाझा संघर्ष आणि आयसीसीच्या या कारवाईमुळे इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. नेतान्याहू आणि गॅलंट यांच्यावर पुढील कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढत आहे.

Comments
Add Comment

Goldy Brar News: अमेरिका-कॅनडाच्या मोस्ट वॉन्टेड यादीत गोल्डी ब्रार! पकडण्यासाठी 8.5 कोटींचे बक्षीस

Goldy Brar: लॉरेन्स बिश्नोई गँगमधील कुख्यात गुंड गोल्डी ब्रार याला अमेरिकेच्या 10 मोस्ट वॉन्टेड फरार आरोपींच्या स्थान

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक, कमी व्याजदरावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हची केली कानउघाडणी

मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या कमी व्याजदरांची प्रशंसा केली असून अमेरिकेच्या

NVIDIA Chip Smuggling : NVIDIA चे माजी वरिष्ठ अधिकारी जय पुरी यांच्या पत्नीचा चिप तस्करी प्रकरणाशी संबंध ? मडी वॉटर्सच्या अहवालाने तंत्रज्ञान विश्वात खळबळ

नवी दिल्ली : एआय (AI) क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मानल्या जाणाऱ्या 'एनव्हीडिया'चे (Nvidia) माजी वरिष्ठ अधिकारी अजय के.

अमेरिकेतील एका निर्णयामुळे सोन्याच्या दरात पडझड? सोन्याचे दर 10 हजारांनी कमी झाले...

मुंबई: नोव्हेंबर महिन्यामध्ये सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण होताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजकडून

बांगलादेशमध्ये पुन्हा आगडोंब, राजधानी ढाकामध्ये नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ

मुंबई: बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडताना दिसत आहे. बांगलादेशच्या माजी

26 अब्ज किमी दूर पोहोचला व्हॉयजर-1! 49 वर्षे वीज कुठून मिळते? NASA च्या यानाने रचले इतिहासातील अनेक विक्रम

अंतराळ विश्वातून एक ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. NASA चे व्हॉयजर-1 हे अंतराळयान पृथ्वीपासून तब्बल 26 अब्ज किलोमीटर