गरज नसताना सॅम कॉन्स्टासने बुमराहशी वाद उकरून काढला. काही वेळा हे अनावश्यक वाद लाभदायी ठरतात तर काही वेळा हानीकारक ठरतात. यावेळी कॉन्स्टासने घातलेल्या वादामुळे भारताचा फायदा झाला आणि ऑस्ट्रेलियाचे नुकसान झाले. वादामुळे खेळावर लक्ष केंद्रीत करणे अनेक खेळाडूंना कठीण होते. यामुळेच एखादा जम बसलेला खेळाडू बाद व्हावा अथवा वेळ वाया घालवणे शक्य व्हावे यासाठी अनेकदा प्रतिस्पर्धी वाद उकरून काढतात. या प्रकारात वाद सुरू करणारा स्वतःच्या फायद्याचा विचार करून प्रतिस्पर्ध्याची हानी करण्याचा प्रयत्न करतो. सिडनी कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपत आला होता. अखेरचे षटक टाकण्यासाठी कर्णधार बुमराहने चेंडू हाती घेचला होता. बुमराह सारख्या तगड्या गोलंदाजाने कोणाला बाद करू नये यासाठी वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाने केला. पण त्यांचा प्रयत्न अपयशी झाला. बुमराहने गोलंदाजी केल आणि ऑस्ट्रेलियाचा एक फलंदाज बाद झाला.Fiery scenes in the final over at the SCG!
How's that for a finish to Day One 👀#AUSvIND pic.twitter.com/BAAjrFKvnQ — cricket.com.au (@cricketcomau) January 3, 2025






