उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकात भीषण अपघात

बांधकाम सुरू असलेली लिंटल कोसळली; अनेक कामगार अडकले, मदतकार्य सुरू


कन्नौज : उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाच्या कामादरम्यान एक गंभीर दुर्घटना घडली. स्टेशनच्या दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम सुरू असलेला लिंटेल अचानक कोसळल्याने मोठा गोंधळ उडाला. अपघाताच्या वेळी २४-२५ कामगार बांधकामात व्यस्त होते. त्यापैकी आतापर्यंत १८ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने इतर गाडलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू ठेवले आहे.


घटनास्थळी मदतकार्याला वेग


या दुर्घटनेत अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन, रेल्वे अधिकाऱ्यांसह एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य गतीने सुरू केले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले जात आहे.


?si=AOcIkJ9dfzEu44M1

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत काम


अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कन्नौज स्थानकावर विकासकाम सुरू होते. मात्र, याच कामादरम्यान लिंटेल कोसळल्याने अपघात घडला. घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.


मुख्यमंत्र्यांचे निर्देश


घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद गतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींना तत्काळ आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.



समाजकल्याण मंत्र्यांची उपस्थिती


समाजकल्याण राज्यमंत्री असीम अरुण हे देखिल घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्याचा आढावा घेत आहेत. अपघातस्थळी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली आहे. प्रशासनाने या दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.


स्थानकावर वातावरण तणावपूर्ण


दुर्घटनेमुळे स्थानकावर तणावाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment

पेट्रोल पंपावर सिगारेट ओढणं महागात! भर पेट्रोल टँकरसमोर दुचाकीला आग; तरुण गंभीर जखमी

हैदराबाद : पेट्रोल पंपावर इंधन भरताना सिगारेट ओढल्याने मोठी दुर्घटना घडल्याची घटना हैदराबादमधील कुकटपल्ली

भारतीय नौदलाच्या 'अल्बाट्रॉस' पथकाने पूर्ण केली सुवर्णमहोत्सवी 50 वर्षे; हिंदी महासागरावर अविरत पहारा

भारतीय नौदलाने आपल्या सामर्थ्यशाली इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे. भारतीय नौदलाच्या दीर्घ पल्ल्याच्या

Manipur News : मणिपूरमध्ये लष्कराचे वाहन नदीत कोसळले; कॅप्टनचा मृत्यू, 3 जवान गंभीर जखमी

मणिपूर : मणिपूरच्या पूर्व इम्फाळ जिल्ह्यात लष्करी जवानांना घेऊन जाणारे वाहन नदीत कोसळल्याने एका कॅप्टनचा

Vande Bharat Express : नातेवाईकांना निरोप देण्यासाठी वंदे भारतमध्ये चढले अन् अडकले! 12 जणांना 36,000 रुपयांचा दंड

उत्तर प्रदेश : रेल्वे प्रवासात नातेवाईकांना निरोप देण्यासाठी ट्रेनमध्ये चढणे 12 जणांना चांगलेच महागात पडले.

Pax Silica : सेमीकंडक्टरपासून सुपर इंटेलिजन्सपर्यंत... भारतासह १० देशांचा AI पुरवठा साखळी सुरक्षित करण्याचा ऐतिहासिक निर्णय!

आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही केवळ मनोरंजनाची किंवा साधी संगणकीय सुविधा राहिलेली नाही, तर ती

AI महासत्तेकडे भारताची मोठी झेप! अमेरिका आणि 8 देशांसोबत 'Pax Silica' करार; भारताला काय फायदा?

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आता फक्त संगणकापुरता विषय राहिलेला नाही. ती देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि