Alibaug-Virar Multipurpose Corridor : अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गिका भूसंपादन अधिकार वाद चव्हाट्यावर

पनवेलच्या प्रांतांऐवजी मेट्रो सेंटर उपजिल्हाधिकारी करणार भूसंपादन


अलिबाग : विरार-अलिबाग या बहुउद्देशीय मार्गिकचे (Alibaug-Virar Multipurpose Corridor) भूसंपादन ठप्प झाल्यानंतर सरकारकडून भूसंपादनाचा निधी उपलब्ध होत असतानाच रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या एका आदेशामुळे पनवेलमधील १३ गावांच्या भूसंपादनाचे अधिकार पनवेल प्रांत अधिकाऱ्यांकडून काढून पुन्हा मेट्रो सेंटरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यत आले आहे. त्यामुळे विरार-अलिबाग या बहुउद्देशीय मार्गिकच्या भूसंपादनाच्या अधिकाराचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे निधीची उपलब्धता असल्याने विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे ९६ किलोमीटर मार्गिकचे भूसंपादन रखडले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनंतर आणि वित्त विभागाच्या हमीनंतर या मार्गाच्या भूसंपादन आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध केला जात आहे. पण निधी उपलब्ध होण्यापूर्वी भूसंपादनाचे अधिकार नेमके कोणाकडे असावेत यासाठी अधिकाऱ्यांमध्ये 'अधिकार युद्ध’ सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.



रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काही दिवसांपूर्वी शासनाला प्रस्ताव पाठविल्यानंतर शासनाने २३ डिसेंबरला या पत्रावर राजपत्र काढून पनवेलमधील १३ गावांच्या भूसंपादनाचे अधिकार पनवेलचे प्रांत अधिकारी पवन चांडक यांच्याकडून काढून भूसंपादनासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेंटर क्रमांक १ अधिकारी दत्तात्रय नवले यांची नियुक्ती केली. नवले यांनी तातडीने ६ दिवसांमध्ये १३ गावांतील भूसंपादनाचा मोबदला स्वीकारण्यासाठी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना नोटीस बजावली. भूसंपादनाची रक्कम ठरविण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने हेक्टरी निर्धारीत केलेले दर त्यासोबत १२ टक्के अतिरिक्त व्याजाची रकम तसेच १०० टक्के दिलासा रक्कम आणि २५ टक्के संमतीचा वाढीव मोबदल्याची रक्कम तातडीने मिळण्यासाठी यासाठी शेतकरी अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. ही रकम लगेच काढून देण्याचे आश्वासन देणारे बोगस दलाल सध्या पनवेलच्या गावांमधील शेतकऱ्यांना संपर्क साधत आहेत. संबंधित नोटीस मिळाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांनी येत्या १५ दिवसात मेट्रो सेंटर कार्यालयाकडे जमा करायचे आहेत. हे पुरावे जमा केल्यावर पुढील महिन्यात या भूसंपादनाची रकम मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत आहे. हे भूसंपादन लवकर व्हावे यासाठी सचिवालयातील काही बड्या अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष या भूसंपादनावर असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.


विरार-अलिबाग मार्गिकेच्या भूसंपादनाचे अधिकार कोणाकडे असावे हे ठरविण्यासाठी महसूल विभागाने पनवेल व उरण या तालुक्यातील गावांची विभागणी यापूर्वीच केली होती. मात्र रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जलदगतीने भूसंपादन होण्यासाठी पनवेलमधील १३ गावांचे अधिकार पुन्हा सेंटर क्रमांक एककडे दिल्याने अधिकाऱ्यांमधील भूसंपादनाच्या ३ ते ४ हजार कोटी रुपयांची रक्कम वाटपाचा वाद पनवेलमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

Comments
Add Comment

चातुर्मास संपणार, शुभकार्यांना सुरुवात! देवूठनी एकादशीची तारीख आणि पूजा विधी

Devutthani Ekadashi 2026: कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला 'देवउठनी एकादशी' किंवा 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हणतात.

Rasika Vengurlekar New Home: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रसिका वेंगुर्लेकरचं घराचं स्वप्न पूर्ण; नव्या घराचा गृहप्रवेश!

Rasika Vengurlekar New Home: मुंबईत आपलं स्वतःच हक्काचं घर असावं अस प्रत्येकाचं स्वप्न असत. त्यासाठी सगळेचजण दिवसरात्र मेहनत घेत

Western Express Highway Bike Stunt: वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जीवघेणे बाईक स्टंट; व्हायरल व्हिडिओनंतर 5 तरुणांना अटक!

Western Express Highway Bike Stunt: महाराष्ट्रातील मुंबई शहरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही बाईकस्वार धोकादायक स्टंट करतांना आणि

Tu Aahes Naa: सुप्रिया पिळगावकर पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘तू आहेस ना’चा इफ्फीमध्ये वर्ल्ड प्रीमियर!

'देवमाणूस' च्या यशानंतर लव फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तू आहेस ना’ या नव्या

अखेर प्रतीक्षा संपली! 'पंचायत 5' ची रिलीज डेट जाहीर; फुलेरा गावात पुन्हा रंगणार राजकारण आणि कल्ला!

मुंबई: ओटीटीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेली आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये

लिफ्ट वापराबाबत राज्य सरकारचे नवे नियम लागू, 1 नोव्हेंबर 2026 पासून नव्या नियमावलीची अंमलबजावणी सुरू

मुंबई: राज्य सरकारने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लिफ्टच्या वापरासंदर्भात नवीन नियम लागू केले आहेत. 'लिफ्ट,