'तनू वेड्स मनू- ३' मधून आर माधवनचा पत्ता कट?

मुंबई :अभिनेता आर माधवन आणि कंगना राणावत यांची मुख्य भूमिका असलेला 'तनू वेड्स मनू' या चित्रपटाचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. चित्रपटाच्या या दोन्ही भागाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता लवकरच 'तनू वेड्स मनू'चा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आर माधवन याने या चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांचं लक्ष त्याने आपल्याकडे वेधलं आहे.


अभिनेता आर माधवनला एका मुलाखतीत तनू वेड्स मनू संदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला, "मला याबद्दल कोणतीही कल्पना नाही. इन्स्टाग्रामवर सुद्धा यासंदर्भात चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर मला लोक प्रश्न विचारत आहेत. पण, अद्यापही मला आनंद एल राय किंवा इतर कोणीही 'तनू वेड्स मनू' च्या तिसऱ्या पार्ट संदर्भात विचारणा केलेली नाही."


पुढे अभिनेता म्हणाला, "मला काहीच माहिती नाही शिवाय स्क्रीप्ट सुद्धा मला दिलेली नाही. कदाचित मला रिप्लेस करण्यात आलं असेल." अभिनेता आर माधवनच्या या वक्तव्यानंतर हे नक्की झाले आहे की तो तनु वेड्स मनू चित्रपटाचा भाग नसणार आहे. त्यामुळे आता माधवन च्या जागेवर कोणता अभिनेता दिसणार हे अद्याप समोर आलेले नाही. पण माधवनला खरंच रिप्लेस केले असेल तर त्यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असेल.

Comments
Add Comment

Samantha Prabhu : समंथा रुथ प्रभूच्या घरी बाळाच्या स्वागतासाठी पूजा; नवव्या महिन्यातील खास फोटो व्हायरल!

समंथा रुथ प्रभू आणि तिचे पती राज निदिमोरू आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. या जोडप्याने

Rasika Vengurlekar New Home: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रसिका वेंगुर्लेकरचं घराचं स्वप्न पूर्ण; नव्या घराचा गृहप्रवेश!

Rasika Vengurlekar New Home: मुंबईत आपलं स्वतःच हक्काचं घर असावं अस प्रत्येकाचं स्वप्न असत. त्यासाठी सगळेचजण दिवसरात्र मेहनत घेत

Tu Aahes Naa: सुप्रिया पिळगावकर पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘तू आहेस ना’चा इफ्फीमध्ये वर्ल्ड प्रीमियर!

'देवमाणूस' च्या यशानंतर लव फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तू आहेस ना’ या नव्या

अखेर प्रतीक्षा संपली! 'पंचायत 5' ची रिलीज डेट जाहीर; फुलेरा गावात पुन्हा रंगणार राजकारण आणि कल्ला!

मुंबई: ओटीटीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेली आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये

Maan Marathi Movie: आशुतोष गोवारीकरांची पहिली मराठी निर्मिती 'मान'; 4 जून 2027 रोजी चित्रपट रिलीज

Maan Marathi Movie: काही दृश्यं शब्दांपेक्षाही अधिक प्रभावीपणे एखाद्या कथेची चाहूल देतात. भेगाळलेली जमीन, त्या जमिनीवरून

Madhavi Nimkar viral video: कोकणच्या मातीशी जोडली नाळ! अभिनेत्री माधवी निमकर गावाकडच्या परंपरेत रमली; हाताने जमीन सारवतानाचा व्हिडीओ चर्चेत

आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात गावाकडच्या साध्या-सुध्या गोष्टींचा आनंद काही वेगळाच असतो. मातीचा सुगंध,