भगवान शंकराला पांढऱ्या रंगाची फुले, बेलाची पाने (बिल्व पत्र किंवा बिल्व दल) अर्पण करावी. रुद्राभिषेक करावा. ॐ नमः शिवाय हा जप करावा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात शिव परिवाराचे चित्र किंवा मूर्ती ठेवून पूजा करावी. घराच्या पूर्वेकडील अथवा वायव्येकडील भागात बेलाचे रोप लावावे. दररोज सकाळ - संध्याकाळ या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरातील वास्तूदोष दूर होण्यास मदत होईल.
घरात कलह किंवा इतर गंभीर समस्या असल्यास त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य कोपऱ्यात रुद्राभिषेक करावा. लघुरुद्र किंवा महारुद्र करावे. हे उपाय मनापासून करण्याने लाभ होतो.
ईशान्य दिशा ही देवी देवतांची दिशा म्हणून ओळखली जाते. यामुळे रुद्राभिषेक याच दिशेला करावा. घराच्या ईशान्येस चंदनाचे खोड ठेवावे.
घरात शुद्ध पाऱ्यापासून तयार केलेले पारद शिवलिंग ठेवावे आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने नियमित पूजा करावी. मनापासून हे कृत्य करण्याने घराचे रक्षण होते. घरावरील संकटे टळतात. घरातील सर्व सदस्यांची प्रगती होण्यास मदत होते. पण पारद शिवलिंग घरात ठेवताना शिवपुराणात नमूद असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
पारद शिवलिंगाची दररोज मनापासून पूजा केल्या पितृदोष दूर होण्यास मदत होते.
अस्वीकरण : नमूद माहिती गृहितके, चालीरीती, रुढी, परंपरा यांच्यावर आधारित आहे. या संदर्भात तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक उपयुक्त ठरेल.