Kandivali terrorist viral video: कांदिवली स्टेशनवरील दहशतवादी क्लिपचा पर्दाफाश; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

बोरिवली शासकीय रेल्वे पोलिसांनी सोमवारी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भीती पसरवण्यासाठी बनावट व्हिडिओ तयार करून तो प्रसारित केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Kandivali terrorist viral video: आजकाल AI व्हिडिओस मोठ्या प्रमाणावर बनवल्या जातात. माहितीची पडताळणी न करता अनेकवेळा या व्हिडिओस बनवल्या जातात आणि अनेकदा AI व्हिडिओमुळे आपण सहज फसतो, या बनावट व्हिडिओमुळे रेल्वे पोलीस आणि RPF पोलिसांची चांगलीच पळापळ झाली होती. एका व्हायरल व्हिडिओमध्ये एके-४७ घेऊन जाणारा एक “दहशतवादी” कांदिवली रेल्वे स्टेशनवर उभा दिसत होता, मात्र प्रत्यक्षात कोणताही सशस्त्र व्यक्ती उपस्थित नव्हता, या व्हिडिओने, रेल्वे पोलीस आणि RPF पोलिसांना चांगलंच कामाला लावलं. भीती पसरवण्यासाठी बनावट व्हिडिओ तयार करून तो प्रसारित केल्याप्रकरणी बोरिवली शासकीय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) सोमवारी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


सोशल मीडियाच्या जमान्यात 'फेक न्यूज' आणि AI चा गैरवापर किती भयानक रूप धारण करू शकतो, याचे ताजे उदाहरण मुंबईतील कांदिवली स्थानकावरील व्हिडिओवरून समोर आले आहे. नुकताच कांदिवली रेल्वे स्थानकावरील एक 5 सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात AK-47 सारखे अत्यंत घातक शस्त्र घेऊन रेल्वे स्थानकाच्या आवारात बिनधास्त फिरत असल्याचे दिसले. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून थेट पाकिस्तानमधून आलेला दहशतवादी असल्याचा दावा या व्हायरल क्लिपमध्ये करण्यात आला होता. मात्र सरकारी रेल्वे पोलिसांनी केलेल्या तपासणी नंतर असे आढळून आले की, ही क्लिप आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार करण्यात आली होती. स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अशी कोणतीही व्यक्ती दिसली नाही. दहशतवादविरोधी पथकात (एटीसी) कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला सोमवारी कर्तव्यावर असताना रेल्वे मुख्यालयातून हे फुटेज मिळाले होते. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.






या संदर्भात बोरिवली शासकीय रेल्वे पोलिसांनी सोमवारी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भीती पसरवण्यासाठी बनावट व्हिडिओ तयार करून तो प्रसारित केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर सेलची चौकशी


सोशल मीडियावर मंगळवारी पसरलेल्या व्हिडिओची पडताळणीसाठी सायबर सेलकडे पाठवण्यात आली. त्यात जिथे असे आढळून आले की एका अज्ञात व्यक्तीने ती ऑनलाइन पोस्ट करण्यापूर्वी एआय ॲप्लिकेशन्सचा वापर करून ती तयार केली होती. या प्रकरणाचा गुन्हे शाखा आता तपास करत असून, हा व्हिडिओ कोणी बनवला, तो केव्हा तयार करण्यात आला आणि तो प्रसारित करण्यासाठी कोणत्या युझर आयडीचा वापर करण्यात आला, हे शोधण्याचा तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

इन्स्टाग्रामवर ओळख अन् मुंबईत भेटीचा प्लॅन! झारखंडहून एकट्या आलेल्या 17 वर्षीय मुलीचा GRP ने घेतला शोध

मुंबई: सोशल मीडियावर केलेली फ्रेंडशिप एका अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतली आहे. इयत्ता 12 वी मध्ये शिकत असलेल्या

वैशाली आणि रूपाली हॉटेलनंतर पुण्यातील खाऊ गल्लीतल्या विक्रेत्यांवरही FDA ची धाड, 5 आस्थापनांना दिली 'व्यवसाय बंद'ची नोटीस

पुणे: सुट्टीच्या अनेक पुणेकरांच्या नाश्त्याची सोय होणाऱ्या सुप्रसिद्ध वैशाली आणि रुपाली या हॉटेलवर अलीकडेच FDA

Maan Marathi Movie: आशुतोष गोवारीकरांची पहिली मराठी निर्मिती 'मान'; 4 जून 2027 रोजी चित्रपट रिलीज

Maan Marathi Movie: काही दृश्यं शब्दांपेक्षाही अधिक प्रभावीपणे एखाद्या कथेची चाहूल देतात. भेगाळलेली जमीन, त्या जमिनीवरून

Thane Development Plan: ठाणे जिल्ह्यात शाळा-रुग्णालयांचा कायापालट; 800 कोटींचा विकास आराखडा

ठाणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील

Bird Flu : भारताला बर्ड फ्लूपासून मोठा दिलासा मिळणार ! देशातील पहिली स्वदेशी H5N1 लस तयार

नवी दिल्ली : देशातील पोल्ट्री व्यावसायिक आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली

Mumbai BEST Bus Fire: ससून डॉकजवळ बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने आग नियंत्रित

Mumbai BEST Bus Fire: मुंबईतील कुलाबा येथील ससून डॉकजवळ आज, बुधवार 18 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी मार्ग क्रमांक 139 च्या बेस्ट बसला आग