Germany Car Accident : जर्मनीत कार चालकाने २० लोकांना चिरडले

बर्लिन : जर्मनीत एक भीषण दुर्घटना घडली आहे. जर्मनीतील म्युनिक येथे गुरुवारी ( १३ फेब्रुवारी ) एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने गर्दीत धडक दिली. या कारने गर्दीत घुसून २० लोकांना चिरडले आहे. यामध्ये लहान मुलांसह अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत कार चालकाला अटक केली आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना ट्रेड युनियन वर्डी या कामगार संघटनेने आयोजित केलेल्या निदर्शनादरम्यान घडली. या निदर्शनाच्या ठिकाणी एका पांढऱ्या रंगाच्या कारने गर्दीत घुसून अनेकांना धडक दिली. या अपघातानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी चालकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत आणि चालकाला घटनास्थळीच पकडण्यात आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की ड्रायव्हर आता इतर कोणासाठीही धोका नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाने जाणीपूर्वक गर्दीत गाडी घातली.



या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने नाकेबंदी केली. तसेच जखमींना वैद्यकीय मदत देखील पुरवण्यात आली आहे. म्युनिख फायर डिपार्टमेंटचे प्रवक्ते गेरहार्ड पेश्के यांनी सांगितले की, आरोपी गर्दीत घुसून लोकांना चिरडत असताना अनेक लोक जवळच्या इमारतींमध्ये पळून गेले होते.सध्या हा हल्ला होता की, अपघात याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. सध्या या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले.बिल्ड वृत्तपत्रानुसार, अपघातात १५ जण जखमी झाले आहेत, तर फोकस मासिकाने ही संख्या २० असल्याचे वृत्त दिले आहे, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. उद्या(१४ फेब्रुवारी) म्युनिकमध्ये जागतिक दर्जाची सुरक्षा परिषद होणार आहे. त्याआधी, या मोठ्या अपघातामुळे सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित होतात.


६१व्या म्युनिक सुरक्षा परिषदेचे आयोजन १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान म्युनिखच्या बेयरिशर हॉफ हॉटेलमध्ये होणार आहे. यासाठी यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स म्युनिखमध्ये दाखल झाले आहेत. १४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या परिषदेसाठी शहरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी हा अपघात घडला आहे.

Comments
Add Comment

'आम्ही तुम्हाला शोधून काढू'; इराणकडून दोन अमेरिकन नौदल अधिकाऱ्यांना थेट धमकी

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. इराणने अमेरिकन नौदलातील दोन वरिष्ठ

Donald Trump Philippines: ट्रम्प यांच्या दौऱ्याला फिलिपिन्समध्ये विरोध; मनिलाच्या रस्त्यांवर आंदोलकांचा गोंधळ

फिलिपिन्सची राजधानी मनिला रविवारी आंदोलनाने हादरली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या

PM Modi Barong Tagalog : पंतप्रधान मोदींचा फिलिपिन्सच्या 'बॅरोंग टॅगालॉग' पोशाखात रॉयल लूक; 'गाला डिनर'मध्ये वेधले जागतिक नेत्यांचे लक्ष!

अनिवासी भारतीयांना आपुलकीची विचारपूस! मनिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या तीन दिवसांच्या फिलिपिन्स

महिला डायरेक्टरला 'आळशी' म्हणणं कंपनीला पडलं महागात; रोजगार न्यायालयाचा मोठा निर्णय

Danny Luo Unfair Dismissal Case: यूकेमधील एका एआय कंपनीने एका महिला डायरेक्टरला तिच्या सहकारी संचालकांनी 'अत्यंत आळशी' म्हणत

अमेरिका, रशिया आणि चीनचे राष्ट्रप्रमुख एकाच मंचावर, 19 नोव्हेंबरला शेनझेनमध्ये ऐतिहासिक त्रिपक्षीय बैठक

जगातील तीन प्रमुख अण्वस्त्रधारी देशांचे राष्ट्रप्रमुख प्रथमच एकाच मंचावर येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

UAE Accident : UAE मधील भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू; चार भारतीयांचा समावेश

UAE Accident: संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) फुजैरा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार