भाजपा जिल्हाध्यक्षांच्या विरोधानंतर टपऱ्या हटविल्या

फुटपाथ मोकळा करण्यात कार्यकर्त्यांना यश


ठाणे : महापालिकेने मंजूर केलेल्या जागेऐवजी रस्त्यालगतच्या मोक्याच्या फूटपाथवर दोन टपऱ्या थाटण्याचा प्रयत्न भाजपाचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी फोल ठरविला. भाजपा कार्यकर्त्यांच्या जोरदार विरोधानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास रात्रीचा खेळ करून ठेवलेल्या टपऱ्या कंत्राटदाराने हटविल्या. ठाण्याचा मानबिंदू असलेल्या ‘तलावपाळी’च्या फूटपाथ व नौपाड्यातील सारस्वत बॅंकेसमोरील फूटपाथ मोकळा करण्यात भाजपा कार्यकर्त्यांना यश आले.


सामान्य नागरिक व पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत स्टॉल वा टपऱ्या उभाराव्यात, असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत; परंतु ठाणे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी नियमावली गुंडाळून मोकळ्या जागांऐवजी चक्क फूटपाथवरच टपऱ्या बसविण्याचा घाट घातला आहे, असा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केला.



नौपाड्यातील सारस्वत बँकेसमोर व तलावपाळीतील फूटपाथवर काल मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचा लोगो असलेले स्टॉल ठेवण्यात आले. एका ठिकाणी स्टॉल मंजूर करून प्रत्यक्षात मोक्याच्या ठिकाणी स्टॉल थाटण्याचा हा उद्योग होता. पादचाऱ्यांना अडथळा होतील, असे स्टॉल वा टपऱ्या ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर, संजय वाघुले यांनी तत्काळ महापालिकेच्या संबंधित विभागांना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. त्याची दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराने पोकलेनच्या मशीनने हे स्टॉल हटविले. तूर्त सारस्वत बँकेसमोरील स्टॉल हटविला असून, तलावपाळी येथील स्टॉलही उचलणार असल्याचे कंत्राटदाराने मान्य केले.

Comments
Add Comment

Sanjay Kelkar Jan Sanvad: SRA योजना, गॅसलाईन अन् प्लॉटिंग फसवणूक; संजय केळकरांच्या जनसंवादात नागरिकांच्या तक्रारी

Sanjay Kelkar: भांजेवाडी येथील रहिवाशांचा विरोध असूनही येथील मालक आणि विकासक एसआरए योजना राबवण्यासाठी दबाव टाकत

शहराच्या झगमगाटापासून दूर... शहापुरात उलगडणार ताऱ्यांचे विश्व; महाराष्ट्रातील नवे डार्क स्काय झोन

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे उभारण्यात आलेले पहिले अत्याधुनिक आणि हाय-टेक 'सॅपो' (SAPO) तारांगण सध्या संपूर्ण

ठाणे जिल्ह्यातील कोतवाल भरती परीक्षेची तारीख बदलली; आता या दिवशी होणार परीक्षा, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी

भिवंडीत खाटूश्याम मंदिरात महिला चोरट्यांचा डाव! दर्शनासाठी आलेल्या आजींचे 14 तोळे सोन्याचे दागिने लंपास

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील ठाकराचा पाडा परिसरातील प्रसिद्ध खाटूश्याम मंदिरात देवाच्या दर्शनासाठी आलेल्या एका

ठाणे हादरले! पहाटे उथळसर परिसरात प्रसिद्ध बार अँड रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; घटनेत सुदैवाने जिवितहानी नाही!

ठाणे: ठाणे शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शुक्रवारी, 13 नोव्हेंबर 2026 रोजी पहाटेच्या सुमारास ठाणे

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! आता सोमवारी 'या' भागांत 24 तास नळ कोरडे राहणार; वाचा संपूर्ण यादी

ठाणे: ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. संभाव्य दुष्काळसदृश