Mumbai Goa highway : मुंबई गोवा महामार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होणार; नितीन गडकरी यांचे आश्वासन

कणकवली : आपण हवाई मार्गे मुंबई-गोवा महामार्गाची (Mumbai Goa highway) पाहणी केली असून, हा महामार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिले.


देवगडचे लोकप्रिय माजी आमदार स्व. जनार्दन मोरेश्वर उर्फ आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप समारंभाला ना. गडकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा उल्लेख केला आणि हा मार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले.


तसेच, जलवाहतूक तोट्याची ठरत असल्याने सी-प्लेन हा उत्तम उपाय आहे. ही वाहतूक कोकण किनारपट्टीवर कोणताही निधी खर्च न करता सुरू करता येईल. यासाठी आपण पुढाकार घ्यावा, मी तुम्हाला योग्य ती मदत करेन असे आश्वासन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना दिले आहे.



त्याचप्रमाणे, वॉटर कार हा प्रकल्पही अंतिम टप्प्यात आहे. रस्त्यावरून पाण्यात आणि पाण्यातून पुन्हा रस्त्यावर फिरणारी बस लवकरच कोकण किनारपट्टीवर सुरू करू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.


आप्पासाहेब गोगटे यांचे स्वप्न असलेला इळये-वरंडवाडी पूल केंद्रीय मार्ग निधीतून उभारण्यासाठी आवश्यक निधी देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

Sanjay Kelkar Jan Sanvad: SRA योजना, गॅसलाईन अन् प्लॉटिंग फसवणूक; संजय केळकरांच्या जनसंवादात नागरिकांच्या तक्रारी

Sanjay Kelkar: भांजेवाडी येथील रहिवाशांचा विरोध असूनही येथील मालक आणि विकासक एसआरए योजना राबवण्यासाठी दबाव टाकत

ICC Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी! भारतात 9 ऑक्टोबरला रंगणार वर्ल्डकप; आयसीसीने केल्या 12 स्पर्धांच्या तारखा जाहीर

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची वेळापत्रक जाहीर झालं असून अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. यासाठी सहभागी

MHT CET 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 11अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा दोनदा होणार; संभाव्य वेळापत्रक जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजेच सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी पदवी आणि

फेक कंटेंट, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आळा घाला! सोशल मीडिया कंपन्यांना अश्विनी वैष्णव यांचा इशारा

सोशल मीडिया अधिक जबाबदार करण्यासाठी आणि तक्रारींच्या निवारणासाठी प्रभावी यंत्रणा तयार करण्यासाठी समाजात सखोल

मैदानावर पुन्हा 'स्काय' शो! अवघ्या 29 चेंडूंत 82 धावा कुटत मुंबईला मिळवून दिला विजय

[caption id="attachment_1075866" align="aligncenter" width="800"] सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियाबाहेर आहे आणि संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे.

Tata Motors best selling car : टाटाच्या या छोट्या कारने मार्केट हलवले! १० महिन्यांत ७० हजार ग्राहक झाले फिदा; पहा कोणती आहे ही गाडी ?

आजच्या काळात प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे स्वतःची एक कार असावी. विशेषतः बजेट कमी असेल, तर लहान आणि