हातचलाकी करत एटीएम बदलणारा परराज्यातील तरुण पोलिसांच्या जाळ्यात

राहाता : हात चालाकी करून एटीएम कार्ड बदलणाऱ्या मध्यप्रदेश येथील मूळ रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय तरुणास राहाता पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडील असलेले विविध बँकेचे एकूण ७० एटीएम हस्तगत केले आहे.


याबाबत माहिती अशी की राहाता येथील भारतीय स्टेट बँकेसमोर असलेल्या एटीएम मशीन जवळ रविवारी सायंकाळी ६ वाजे दरम्यान एक अनोळखी इसम एटीएम जवळ गिरट्या मारत असल्याचा फोन राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना आला पोलीस उपनिरीक्षक यांनी तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल झिने यांना बरोबर घेऊन स्टेट बँकेच्या एटीएम कडे धाव घेत त्या ठिकाणी एटीएम च्या बाहेर फिरत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्याजवळ विविध बँकेचे एकूण ७० एटीएम व दोन फेविक्विक ट्यूब हस्तगत केल्या असून त्याने त्याचे नाव दीपक राजेंद्र सोनी वय वर्ष ३५ राहणार वॉर्ड नंबर ११,गोवर्धन टाकी जवळ,छत्रपूर, मध्य प्रदेश असे सांगितले  आहे.



काही महिन्यापूर्वी नांदुरखी येथील एका व्यक्तीचे एटीएम मधून हात चाले की करत पैसे गेले होते. पोलिसांनी रविवारी पकडलेला व्यक्ती तोच असून याच व्यक्तीने माझ्याकडे असलेले एटीएम घेऊन मला हात चालाकी करत फसवले असल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी या घटनेबाबत फोन आल्यावर लगेचच तत्परता दाखवल्यामुळे हात चालाकी करून एटीएम कार्डची आदलाबदल करत अनेकांचे पैसे लुबाडणाऱ्या या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल झिने यांचे कौतुक केले जात आहे.


या घटनेनंतर पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी राहाता पोलीस ठाण्यात भेट देऊन त्या आरोपीची माहिती घेतली पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण हे या गुन्हचा तपास करीत आहे.या आरोपीला न्यायालयात हजर केले असता राहाता न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांनो, ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा! सरकारी मदत मिळवण्यासाठी महत्त्वाचे आवाहन

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांसह अन्य शासकीय योजनांचा लाभ थेट

राज्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील दारात आता आरोग्यसेवा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’चे उद्घाटन

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी

Eknath Shinde : 11 वर्षांपासून बंद असलेला नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कारखाना पुन्हा सुरू होणार; केंद्राकडून 1,500 कोटींची मदत

पुणे : तब्बल 11 वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या कारखान्याला पुन्हा

Samruddhi Mahamarg : 120 वेगमर्यादेच्या समृद्धी महामार्गावर गुरांचा कळप! वाहनचालकांचा थरकाप, मोठा अनर्थ टळला

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ नुकताच २ दिवसापूर्वी भीषण

केंद्र सरकारकडून आदिवासी बांधवांवर योजनांचा पाऊस, 'या' गोष्टींमुळे समाजाचे पालटणार जीवन

मुंबई: भारतात आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या संस्कृतीच्या जतनासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक

आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; गडचिरोलीला विकासाच्या नकाशावर पहिल्या क्रमांकावर आणणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

गडचिरोली: आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त रविवारी देशभरात जनजातीय गौरव दिवस