Kokan Heavy Rain : सिंधुदुर्गात पावसाचे धुमशान

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने धुमशान घातले. कणकवली, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील बहुतांशी गावात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने त्रेधातिरपट उडवून दिली. सुमारे तासभर हा गडगडाटी पाऊस सुरु होता. यामुळे रखरखत्या उन्हाळ्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. बऱ्याच ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे विद्युत वाहिन्यांवर कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. बहुतांशी गावे अंधारात आहेत. कोनाळकट्टा येथे घरावर झाड पडून नुकसान झाल्याची घटना घडली. दरम्यान अवकाळी पावसाच्या नुसत्या चाहूलीनेच सावंतवाडी शहरातील महावितरणची बत्ती लगेच गुल झाली. केवळ वारा सुटला आणि बत्ती गुल झाली. कणकवली तालुक्यातील सह्याद्री पट्टयात या वादळी पावसाचा तडाखा बसला.



कनेडी, भिरवंडे, हरकूळ खुर्द, फोंडाघाट परिसरातून वैभवाडी तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती. दोडामार्ग तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. अवकाळी पावसामुळे काजू, आंबा बागायदार शेतकरी धास्तावला आहे. पावसामुळे आंबा फळ काळे पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर बनला आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.