Nashik News : नाशिकमध्ये स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुटवड नगर परिसरात एका महिलेने मुलांची परीक्षा सुरू असल्यामुळे स्पीकरचा आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र, यामुळे संतापलेल्या तरुणाने तिच्या घरावर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुटवड नगर पोलीस चौकीसमोरील वेणु नगर भागात पुनित बन्सल हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्याच घराच्या मागे कुंवर नावाचा तरुण (वय २५ वर्षे) राहतो. सध्या बन्सल यांच्या मुलीची परीक्षा सुरू असल्याने ती अभ्यासात मग्न होती. मात्र, याच दरम्यान, कुंवरने आपल्या घरातील स्पीकर मोठ्या आवाजात लावला होता.



स्पीकरच्या मोठ्या आवाजामुळे मुलीच्या अभ्यासात व्यत्यय येत असल्याने तिने आपल्या आईकडे तक्रार केली. त्यानंतर बन्सल यांच्या पत्नीने कुंवरला स्पीकरचा आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र, या गोष्टीचा राग आल्याने कुंवरने बन्सल यांच्या घरात घुसून साहित्याची नासधूस केली. तसेच घरातील लहान मुलांची सायकल आणि बाहेर लावलेली दुचाकी रस्त्यावर फेकून दिली.


यावरही न थांबता, कुंवरने संतापाच्या भरात बन्सल यांच्या घरावर दगडफेक केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.


घटनेनंतर पुनित बन्सल यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान, परीक्षेच्या काळात होत असलेल्या अशा घटनांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करत आरोपीला अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment

सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कार दुभाजकाला आदळून भीषण आग, आगीत कार चालकाचा मृत्यू

नवी मुंबई: नवी मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावर अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारा कार अपघात झाला आहे. रस्ता

मुंबईसह पुण्यामध्ये प्रतिबंधित खाद्यपदार्थांवर FDA ची कारवाई, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई: अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) शुक्रवारी राज्यामध्ये कारवाईदरम्यान न्यूट्रास्युटिकल्स, आरोग्य पूरक आणि

व्हिडीओ लीक करण्याची धमकी देत चौघांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुंबई पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

मुंबई: मुंबईतील कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक अत्यंत गंभीर प्रकरण उघडकीस आले

U19 Asia Cup 2026: भारताच्या 252 धावांवर 8 विकेट आणि 86 धावांची गरज! पाकिस्तानला 51 चेंडूत अशी दिली मात

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. हा सामना हायव्होल्टेज होणार यात

मराठी सिनेमांचा महाकुंभ! 'चित्रपताका 2026' महोत्सवाचे रविवारी होणार उद्धाटन; प्रवेश नोंदणीचे शुल्क दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

मुंबई: सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त

U19 Asia Cup 2026 अंतिम स्पर्धेत भारताचा शेवटच्या चेंडूवर विजय, पाकिस्तानचा हिशेब केला चुकता

एसीसी आशिया कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा