IPL 2025: तब्बल १७ वर्षांनी आरसीबीने चेन्नईला चेपॉकमध्ये हरवले, मिळवला ५० धावांनी विजय

चेपॉक: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ८व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपरकिंग्सला ५० धावांनी हरवले. आरसीबीने चेन्नईसमोर विजयासाठी १९७ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ ८ बाद १४६ धावाच करता आल्या. ५० धावांनी आरसीबीने हा सामना जिंकला आहे.


तब्बल ६१५५ दिवसांनी आरसीबीने चेन्नईला चेन्नईच्या मैदानात हरवून दाखवले. २००८मध्ये पहिल्यांदा आरबीसीने चेन्नईला त्यांच्याच मैदानात हरवले होते. त्यानंतर आरसीबीला चेन्नईला हरवण्यासाठी १७ वर्षे वाट पाहायला लागली.चेन्नईने याआधी पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला चार विकेटनी हरवले होते. तर दुसरीकडे आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्सला सात विकेटनी पराभूत केले होते.


आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात खराब राहिली. सीएसकेने पावरप्लेमध्ये तीन विकेट गमावले. आधी जोश हेझलवूडने दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतले. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने तिसरी विकेट घेतली. त्यानंतर सॅम करन ८ धावा करून परतला. यावेळी चेन्नईची धावसंख्या ४ बाद ५२ इतकी होती.


यानंतर यश दयालने सीएसकेलेला दोन मोठे झटके दिले. दयालने सेट झालेल्या रचिन रवींद्रला बोल्ड केले. त्यानंतर शिवम दुबेला बाद केले. रवींद्रने ५ चौकाराच्या मदतीने सर्वाधिक ३१ बॉलवर ४१ धावा केल्या. तर शिवम दुबेने दोन चौकार आणि एक सिक्सच्या मदतीने १९ धावांची खेळी केली.


तत्पूर्वी, आरसीबीने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना सात बाद १९६ धावा केल्या होत्या.बंगळुरूकडून कर्णधार रजत पाटीदारने सर्वाधिक ५१ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ३१ धावांची खेळी केली. सलामीवीर फिल सॉल्टने ३२ धावा केल्या. देवदत्त पड्डिकलने २७ धावा ठोकल्या. टीम डेविड जबरदस्त खेळला. त्याने ८ बॉलमध्ये २२ धावा तडकावल्या. शेवटच्या षटकांत डेविडने ३ षटकार ठोकले. त्यामुळे बंगळुरूला ही मोठी धावसंख्या गाठता आली.


Comments
Add Comment

Asian Games 2026 : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाची ऐतिहासिक कामगिरी, चीनविरुद्ध झुंजत पटकावले कांस्यपदक!

नागोया: जपानमधील आयची येथे सुरू असलेल्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने उल्लेखनीय

आयपीएल 2027 चा महासंग्राम! भारतात 'या' शहरात पार पडणार मिनी लिलाव प्रक्रिया; तारीख आणि वेन्यू फायनल!

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सर्वच फ्रेंचायझींची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रत्येक फ्रेंचायझी आपला संघ सक्षम

तिकीट विंडो उघडली अन् बंद झाली! एका मिनिटात भारत वेस्ट इंडिज सामन्याची सर्व तिकिटे विकली, झालं असं की..

वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला असून तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या

शुभमन गिललाही संघाचा बाहेर बसावं लागणार? गौतम गंभीरने नेमकं काय सांगितलं?

श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळली. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे

PM Modi Praises Jay Meena : जय मीनाचे सॉफ्ट टेनिसमधील ऐतिहासिक यश; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताचा युवा खेळाडू जय

जसप्रीत बुमराहची 'जपानी उशी' सोशल मीडियावर चर्चेत! काय आहे खासियत

भारतीय पुरूष संघ एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी जापान दौऱ्यावर आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने जापान विरुद्ध