Nilesh Rane : तुमच्यासमोर लहानाचा मोठा झालो, पुन्हा एकत्र यायचं ठरवलंच होतं

शिवसेना आमदार निलेश राणे झाले भावूक


सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे (Nilesh Rane) कुडाळमधील एका कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांबद्दल बोलताना भावूक झालेले पाहायला मिळाले. राणे कुटुंबासोबत काम केलेले हे कार्यकर्ते कोणे एके काळी कट्टर विरोधक बनले होते. मात्र त्यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे पुन्हा एकत्र आल्याचे पाहून निलेश राणे यांनी समाधान व्यक्त केले.


मला लहानपणापासून बघितलेली ही सगळी मंडळी आहेत. माझ्याकडे शब्द नाहीत तुमचे आभार मानायला. मी लहानाचा मोठा तुमच्यासमोर झालेलो आहे. माझ्या मनात एकच विचार असायचा, जेव्हा आपण वेगवेगळ्या पक्षांमध्ये होतो, माझ्या मनामध्ये मी एक दिवस ठरवले होते, की कधीतरी एक दिवस असा येईल, जेव्हा परत हे सगळे जण व्यासपीठावर एकत्र येतील, अशा भावना निलेश राणे यांनी व्यक्त केल्या.



शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत


ज्यांच्यासमोर मी लहानाचा मोठा झालो, त्यांनी मला राजकीय संस्कार दिलेत. राणे साहेब यांचे मार्गदर्शन तर आहेच. त्यांनी मला शिकवले ते माझे गुरू आहेतच. संजय पडते, काका कुडाळकर, दत्ता सामंत यांनी मला मोठे केले, त्यांना मी कधीतरी एकत्र आणणार. राणे साहेबांच्या लोकांना मी वेगळ्या आशेने बघायचो, यांना कोणताही त्रास, अडचण होता नये. हे आहेत त्यामुळे आम्ही आहोत. ही भावना मनात घेऊन राजकारणात उतरलो. निलेश राणेंच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जेवढे काय करायचे, ते मी करणार असे निलेश राणे म्हणाले.



धर्मवीर ज्वाला कार्यक्रमात सहभागी


याआधी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या वढू बुद्रुक समाधी स्थळावरून 'धर्मवीर ज्वाला' सिंधुदुर्ग जिल्ह्यात निलेश राणे यांच्या कुडाळ मतदारसंघात येथे आली होती. या कार्यक्रमामध्ये निलेश राणेंनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करत हिंदू धर्माची परंपरा, शंभूराजांनी धर्मासाठी दिलेलं बलिदान, त्याग याविषयी भाष्य केले.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''