संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेचे १५९ तास चालले कामकाज

अनेक महत्वाच्या विधेयकांना मिळाली दोन्ही सभागृहांची मंजूरी


नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. राज्यसभा आणि लोकसभा अशा दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. ३१ जानेवारी २०२५ रोजी या अधिवेशनाला सुरवात झाली होती. या अधिवेशनामध्ये सरकारने देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला, वक्फ दुरुस्ती विधेयक, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक, स्थलांतर आणि विदेश विधेयक यांना दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाली. यानंतर संसदेचे पावसाळी अधिवेशन होईल.


राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहाच्या २६७ व्या सत्राच्या समारोपप्रसंगी सर्व सदस्यांचे सक्रिय योगदान दिल्याबद्दल आभार मानले.



त्यांनी सांगितले की, या अधिवेशनात राज्यसभेचे एकूण १५९ तास कामकाज झाले. सभागृहाची उत्पादकता ११९ टक्के होती. अधिवेशनामध्ये, राज्यसभेचे सर्वात जास्त वेळ कामकाज ३ एप्रिल रोजी झाले. यादिवशी सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरुवात झाली, सलग १७ तासानंतर ४ एप्रिल रोजी पहाटे ४:०२ वाजता कामकाज संपले.


राज्यसभेच्या इतिहासातील सर्वात जास्त वेळ कामकाज झालेला दिवस म्हणून ३ एप्रिल नोंदवला गेला. याशिवाय या अधिवेशनात ४९ खाजगी विधेयके सादर करण्यात आली, जो एक नवीन विक्रम आहे, असे राज्यसभा सभापती धनखड म्हणाले.



अधिवेशनात लोकसभेच्या झाल्या २६ बैठका


लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सभागृहात म्हणाले की, या अधिवेशनात लोकसभेच्या एकूण २६ बैठका झाल्या आणि त्यांची उत्पादकता ११८ टक्के होती. या काळात १० नवीन सरकारी विधेयक मांडण्यात आली आणि १६ विधेयक मंजूर करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने वक्फ दुरुस्ती विधेयक, २०२५ आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक, २०२४ यांचा समावेश होता.
दरम्यान, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात पार पडले. पहिला टप्पा ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान चालला. तर दुसरा टप्पा १० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान चालला. या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Comments
Add Comment

Raul John Aju: वय 16, स्वतःची AI कंपनी; वडिलांनाही दिली 2 लाखांची नोकरी!

क्रिकेटपासून ते बॉलिवूड आणि अगदी व्यवसायापर्यंत GenZ प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. या पिढीतील तरुण फक्त

हायकोर्टाच्या नावाने फसवणूक! 129 वेबसाइट्स ब्लॉक, पीएमओने मागितले स्पष्टीकरण

पंतप्रधान कार्यालयाने आज (१४ नोव्हेंबर) दूरसंचार सचिव अमित अग्रवाल यांना बोलावून एका मोठ्या पडताळणी

आधार कार्डमधील मोबाईल नंबर कसा बदलायचा; तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही

[caption id="attachment_894861" align="aligncenter" width="1200"] आधार कार्डवरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी अनेकदा लोकांना तासनतास

Delhi Red Fort bomb blast : 'स्फोटाशी आमचा संबंध नाही'; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचा न्यायालयात दावा!

लाल किल्ला स्फोट प्रकरणात अटक केलेल्या आरोपींवरील आरोप निश्चितीसंदर्भात दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू

Cute Panda Viral Video : मुलीचा तोल गेला अन् थेट पांडाच्या पिंजऱ्यात कोसळली! पुढे जे घडले ते पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल...

सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यापैकी काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात, तर

Gurugram couple car chase news : 'दिवाळीची रात्र ठरली जीवघेणी...' गुरुग्राममध्ये जोडप्याच्या कारचा फिल्मी स्टाईल पाठलाग; थेट घराच्या गेटपर्यंत आला संशयितांचा जमाव अन् पुढे...

गुरुग्राम : देशातील 'मिलेनियम सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि चकचकीत रोषणाईने नटलेल्या गुरुग्राम शहरातील