Mohan Babu : 'कन्नप्पा' चित्रपटाच्या यशासाठी प्रसिद्ध अभिनेते व चित्रपट निर्माते मोहन बाबू साईचरणी लीन!

शिर्डी : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माते डॉ. मोहन बाबू (Mohan Babu) यांनी शिर्डीत (Shirdi Sai Darshan) येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. एक दोन नाही तर तब्बल पाच भाषेत एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या 'कन्नप्पा' या चित्रपटाच्या यशासाठी साई चरणी प्रार्थना केली असल्याचं मोहन बाबू यांनी सांगितले आहे.



अनेक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहात असलेल्या 'कन्नप्पा या चित्रपटाच्या यशासाठी आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असल्याचे सांगत, लवकरच हा चित्रपट ५ भाषेत प्रदर्शित होणार आहे. माझा कुठल्याही नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याआधी शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतो, साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन नवीन चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करतो, असे मोहन बाबू यांनी म्हटले.


साईबाबांच्या दर्शनानंतर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी मोहन बाबू यांचा शॉल आणि साईमूर्ती देऊन सत्कार केला. तसेच साईबाबांच्या कृपेनं 'कन्नप्पा' हा चित्रपट यशस्वी ठरो आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवो अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.



तीन ज्योतिर्लिंगाचेही घेणार दर्शन


'कन्नप्पा' या चित्रपटाचा यशासाठी आज साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली. तसेच हा चित्रपट देव आधी देव महादेव यांचे परमभक्त 'कन्नप्पा' यांच्या जीवनकथेवर आधारित असल्याने भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर , घृष्णेश्वर या तिन्ही महादेवाच्या ज्योतिर्लिंग ठिकाणी जाऊन दर्शन घेणार असून या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करणार असल्याचही मोहन बाबू यांनी सांगितले.



काय असेल कन्नप्पा चित्रपटाची कथा?


'कन्नप्पा' हा चित्रपट मोहन बाबू यांनी निर्मित केला असून मुकेश कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कन्नप्पा हा एक ऐतिहासिक महाकाव्य आहे ज्यात भगवान शिवाच्या एका महान भक्ताची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. मोहनलाल, अक्षय कुमार, प्रभास आणि काजल अग्रवाल यांच्या उत्कृष्ट अभिनयासह विष्णू मंचू कन्नप्पाची भूमिका साकारत आहेत. तर प्रीती मुकुंदन देखील मुख्य भूमिका साकरणार आहे. दरम्यान, हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Comments
Add Comment

सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कार दुभाजकाला आदळून भीषण आग, आगीत कार चालकाचा मृत्यू

नवी मुंबई: नवी मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावर अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारा कार अपघात झाला आहे. रस्ता

मुंबईसह पुण्यामध्ये प्रतिबंधित खाद्यपदार्थांवर FDA ची कारवाई, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई: अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) शुक्रवारी राज्यामध्ये कारवाईदरम्यान न्यूट्रास्युटिकल्स, आरोग्य पूरक आणि

व्हिडीओ लीक करण्याची धमकी देत चौघांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुंबई पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

मुंबई: मुंबईतील कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक अत्यंत गंभीर प्रकरण उघडकीस आले

मराठी सिनेमांचा महाकुंभ! 'चित्रपताका 2026' महोत्सवाचे रविवारी होणार उद्धाटन; प्रवेश नोंदणीचे शुल्क दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

मुंबई: सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त

आधार कार्डमधील मोबाईल नंबर कसा बदलायचा; तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही

[caption id="attachment_894861" align="aligncenter" width="1200"] आधार कार्डवरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी अनेकदा लोकांना तासनतास

अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या भारतीय तरुणाला 30 वर्षांची शिक्षा, अल्पवयीन सांगून करायचा ब्लॅकमेल

ब्रिटन: ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या 27 वर्षीय भारतीय वंशाच्या बिलाल काझी या तरूणाला अल्पवयीन मुलींना आपल्या