रशियाकडून भारताला मिळाली इग्ला - एस क्षेपणास्त्र

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला रशियन बनावटीच्या इग्ला-एस या खांद्यावरुन चालवता येणार्‍या हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांचा नवा साठा (कन्साईनमेंट) मिळाला आहे. या क्षेपणास्त्रांमुळे जमिनीवर, जंगलात, बोटीत किंवा डोंगराळ भागात उभे राहून थेट विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा वेध घेणे शक्य आहे. केंद्राने सैन्याला दिलेल्या आपत्कालीन खरेदी अधिकारांतर्गत केलेल्या कराराचा भाग म्हणून इग्ला-एस क्षेपणास्त्रांचा नवीन पुरवठा प्राप्त झाला आहे.


भारतीय लष्कराने २६० कोटी रुपयांत नव्या इग्ला-एस क्षेपणास्त्रांचा साठा खरेदी केला आहे. ही क्षेपणास्त्र दिवस असो वा रात्र, उन - पाऊस - वादळ - वारा अशा कोणत्याही वातावरणात आणि कोणत्याही वेळी शत्रुच्या विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा वेध घेण्यास सक्षम आहेत. भारतीय हवाई दलानेही आधुनिक इग्ला-एस क्षेपणास्त्रांचा साठा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. लष्कराने तर नवा साठा खरेदी करतानाच आणखी इग्ला-एस क्षेपणास्त्रांची ऑर्डर दिली आहे. या अंतर्गत ४८ लाँचर्स आणि ९० क्षेपणास्त्र खरेदी केली जाणार आहेत. सध्याचे इग्ला-एस क्षेपणास्त्र इन्फ्रा रेड सेन्सरच्या मदतीने शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहे. भारतीय सैन्य आता लेझर बीमच्या मदतीने आणखी अचूक आणि वेगवान असा हल्ला करुन शत्रू सैन्याला नामोहरम करण्याची योजना आखत आहे. यासाठी भारत लेझर मार्गदर्शक इग्ला-एस क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा विचार करत आहे.


इग्ला क्षेपणास्त्राची पहिली आवृत्ती १९९० च्या सुमारास रशियाच्या सैन्याने वापरली. यानंतर सातत्याने या क्षेपणास्त्रात सुधारणा केल्या जात आहेत. आता या क्षेपणास्त्राची इग्ला-एस ही अतिशय आधुनिक आवृत्ती तयार करण्यात आली आहे. हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र भारताने खरेदी केले आहे. भारतातल्याच एका कंपनीने जुन्या आवृत्तीच्या क्षेपणास्त्रांच्या विद्यमान साठ्याचे नूतनीकरण करुन दिले आहे. भारतीय सैन्य मोठ्या संख्येने हवाई संरक्षण यंत्रणा खरेदी करणे आणि सज्ज ठेवणे यावर भर देत आहे. लष्कराने स्वदेशी इंटिग्रेटेड ड्रोन डिटेक्शन अँड इंटरडिक्शन सिस्टीम मार्क १ तैनात केली आहे. ही यंत्रणा आठ किमी अंतरावरील ड्रोन शोधून त्यावर प्रतिहल्ला करू शकते. ड्रोन नष्ट करू शकते. या प्रणालीत लेझरच्या मदतीने ड्रोन जाळण्याचीही यंत्रणा आहे.आर्मी एअर डिफेन्स युनिट्सने अलीकडेच जम्मू प्रदेशातील १६ व्या कॉर्प्सच्या हद्दीत लेझरच्या मदतीने शत्रुचा ड्रोन जाळण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.

Comments
Add Comment

उत्तर प्रदेशातील मत्स्यपालनाला मिळणार जागतिक बळ; गोरखपूरमध्ये 'वर्ल्डफिश सेंटर'चे कार्यालय!

लखनौ: 'वर्ल्डफिश सेंटर' उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे मत्स्यपालन प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले. यावेळी

भारताची अमेरिकेला निर्यात 11 टक्क्यांनी वाढली; सहा महिन्यांत 50.80 अब्ज डॉलरची निर्यात

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारासाठी (BTA) वाटाघाटी सुरू असतानाच

Microsoft 365 ची सेवा पुन्हा रुळावर! Outlook सेवा पूर्ववत; जगभरातील युजर्सना मोठा दिलासा!

मुंबई: नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या 18 तासांपासून बंद असलेलं मायक्रोसॉफ्ट आऊटलूक (Microsoft Outlook)ची सेवा

Winter Destinations: हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय? भारतातील 'ही' ६ ठिकाणं आहेत पर्यटनासाठी परफेक्ट!

[caption id="attachment_1074920" align="alignnone" width="800"] 1.मनाली, हिमाचल प्रदेशबर्फाच्छादित पर्वत, सुंदर दऱ्या आणि थंड वातावरणासाठी मनाली

India first LED Dome Planetarium : म्हैसूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या 'एलईडी डोम' तारांगणाचे उद्घाटन!

म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi)  यांनी शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) म्हैसूर विद्यापीठ परिसरात देशातील

National Sports Awards 2025: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका! विदित गुजराती, दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विदित संतोष गुजराती आणि दिव्या जितेंद्र देशमुख यांना